Mumbai Indians IPL 2022, MI vs DC : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा निरोप विजय मिळवून घेतला. दिल्ली कॅपिटल्सवर त्यांनी ५ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवला. DC च्या या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( RCB) प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले. मुंबईच्या या विजयाचा फायदा RCB ला झाला असला तरी २०१८मध्ये दिल्लीकडून झालेल्या अपमानाचा मुंबईने काल खऱ्या अर्थाने बदला घेतला....
काल झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah)ने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेत दिल्लीचे कंबरडे मोडले. डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज अपयशी ठरले. रोव्हमन पॉवेल ( ४३) व रिषभ पंत ( ३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा २ धावांवर माघारी परतला, परंतु डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३७) व इशान ( ४८) या जोडीने ५१ धावांची भागीदारी केली. टीम डेव्हिडने ११ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३४ धावा करून सामना मुंबईच्या पारड्यात आणून दिला होता. तिलक वर्मा २१ धावांवर माघारी परतला. पण, मुंबईने विजय पक्का केला आणि दिल्लीच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशांना सुरूंग लावला..
२०१८मध्ये नेमकं काय झालं होतं?
२०१८च्या आयपीएलचा ५५ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला गेला. मुंबईचा तो अखेरचा साखळी सामना होता. रिषभ पंत ( ६४) व विजय शंकर ( ४३*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने ४ बाद १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईकडून एव्हिन लुईस ( ४८) व बेन कटिंग ( ३७) यांनी संघर्ष केला, परंतु दिल्लीने १६३ धावांत त्यांचा डाव गुंडाळला. संदीप लामिचाने ( ३-३६), हर्षल पटेल ( ३-२८) व अमित मिश्रा ( ३-१९) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. २०१८च्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स तळाच्या क्रमांकावर होती आणि मुंबईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचा होता. पण, दिल्लीने विजय मिळवून मुंबईचे प्ले ऑफचे स्वप्न धुळीस मिळवले. मुंबईला १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
Web Title: In IPL 2018 DC was on the bottom of the points table but win the last match to knock MI out of play offs. In IPL 2022 MI is bottom placed but they have knocked DC out of play offs race
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.