Join us  

लखनौमध्ये पावसाची 'बॅटिंग', अखेर टॉस झाला; कृणाल कॅप्टन अन् धोनीच्या निर्णयाने सगळेच 'शॉक'

IPL 2023, CSK vs LSG : आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 3:40 PM

Open in App

CSK VS LSG Live Match । लखनौ : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे दोन्हीही संघ आपल्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाले होते. त्यामुळे आजचा सामना चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. लखनौचा नियमित कर्णधार लोकेश राहुल दुखापतीमुळे आजचा सामन्याला मुकला आहे. त्यामुळे लखनौच्या संघाची धुरा कृणाल पांड्या सांभाळत आहे.

महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर समालोचकांसह कृणाल पांड्याने देखील धोनीच्या या निर्णयाचे स्वागत केले. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी घेईल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण धोनीने सर्वांना चुकीचे ठरवत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

लखनौला आपल्या शेवटच्या सामन्यात आरसीबीकडून तर चेन्नईला पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आयपीएलचा सोळावा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. जवळपास सर्वच संघांनी आठ ते नऊ सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला १२ गुणांसग गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे, तर लखनौचा संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी स्थित आहे. लखनौपाठोपाठ चेन्नई सुपर किंग्ज समान गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. 

क्रुणाल पांड्याकडे कर्णधारपद 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सचेन्नई सुपर किंग्सक्रुणाल पांड्यामहेंद्रसिंग धोनीलोकेश राहुल
Open in App