मोहाली : आयपीएलमध्ये (IPL 2023) आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळवला जात आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे पंजाबच्या संघात शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. गुरूनूर ब्रार हा युवा खेळाडू आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. ब्रारने आपल्या पहिल्याच चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार लोकेश राहुलला फसवले होते पण सहकाऱ्याची साथ मिळाली नाही.
गुरूनूर ब्रारने टाकलेला पहिलाच चेंडू राहुलच्या बॅटेचा किनारा घेऊन अथर्व तायडेच्या हातात गेला. पण अथर्वला हा झेल पकडता न आल्याने राहुलला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले.
आजच्या सामन्यासाठी पंजाबचा संघ - शिखर धवन (कर्णधार), अर्थव तायडे, सिकंदर रझा, लियम लिविंगस्टन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी लखनौचा संघ -केएल राहुल (कर्णधार),काइल मायर्स, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बढोनी, नवीन उल हक, रवि बिश्नोई, आवेश खान, यश ठाकुर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"