MI vs PBKS Live Match । मोहाली : आज मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांसमोर पंजाब किंग्जचे आव्हान आहे. दोन्हीही संघ आपला शेवटचा सामना जिंकून इथे आले आहेत. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरूद्ध शानदार विजय मिळवून विजयाच्या पटरीवर पुनरागमन केले. अखेरच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर षटकार ठोकून टीम डेव्हिडने मुंबईच्या शिक्कामोर्तब केला होता. तर पंजाबने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. अखेरच्या चेंडूवर सिकंदर रझाने विजयी तीन धावा काढल्या होत्या.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने मिश्किलपणे शिखर धवनला काय घेऊ? असा प्रश्न विचारला. यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनला देखील हसू आवरले नाही.
गुणतालिकेत भरारी घेण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आताच्या घडीला पंजाबचा संघ दहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे, तर ८ गुणांसह मुंबई त्यांच्या पाठोपाठ सातव्या स्थानी स्थित आहे. त्यामुळे सहावा विरूद्ध सातवा या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहण्याजोगे असेल. लक्षणीय बाब म्हणजे रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी आज २००वा सामना खेळत आहे.
आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, वढेरा, अर्शद, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कार्तिकेय, मधवाल.
इम्पॅक्ट - सूर्यकुमार यादव, स्टब्स, ब्रेव्हिस, रमणदीप, विनोद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"