Join us  

rcb vs lsg : केएल राहुलने टॉस जिंकला! लखनौच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री; RCB नेही केले २ महत्त्वाचे बदल 

rcb vs lsg live match : आयपीएलच्या १६व्या हंगामातील १५वा सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 7:11 PM

Open in App

ipl 2023, rcb vs lsg live । बंगळुरू : आयपीएलच्या १६व्या हंगामातील १५वा सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB vs LSG) संघ लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. दोन्हीही संघांनी या स्पर्धेत १ विजय आणि १ पराभव स्वीकारून इथपर्यंत मजल मारली आहे. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकेश राहुलने संघात एक बदल केला असून रोमॅरिओ शेफर्डच्या जागी वेगवान गोलंदाज मार्क वुडची संघात एन्ट्री झाली आहे. तर आरसीबीने वेन पार्नेल आणि महिपाल लोमरोर यांना संधी मिळाली आहे.

खरं तर तब्बल ९ वर्षांनंतर वेन पार्नेल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. दरम्यान, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने मुंबईला पराभूत करून विजयी सलामी दिली होती. पण केकेआरने दुसऱ्याच सामन्यात आरसीबीला पराभवाचा धक्का दिला होता. तर लोकेश राहुलचा लखनौचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध विजय मिळवून आणि सीएसकेविरूद्ध पराभव स्वीकारून बंगळुरूत पोहचला आहे. लखनौचा कर्णधार लोकेश राहुल आज मोठी खेळी करून लय पकडणार का हे पाहण्याजोगे असेल. तर बंगळुरूची सलामी जोडी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस शानदार फॉर्ममध्ये आहे. आताच्या घडीला दोन्हीही संघाचे २ गुण आहेत पण लखनौचा संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे तर आरसीबी सातव्या स्थानावर स्थित आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध मोठा विजय मिळवून लखनौने नेट रनरेट मजबूत केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीलोकेश राहुलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्स
Open in App