Join us  

रोहित शून्यावर बाद होताच पंजाबनं उडवली 'खिल्ली', मुंबईने ५ ट्रॉफींची आठवण करून दिली

rohit sharma ipl : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला त्यांच्या घरात पराभूत करून सलग दुसरा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 3:18 PM

Open in App

MI vs PBKS | मोहाली : मुंबई इंडियन्सने (mumbai indians vs punab kings) पंजाब किंग्जला त्यांच्या घरात पराभूत करून सलग दुसरा विजय मिळवला. मुंबईचा कालचा विजय म्हणजे व्याजासकट वसुली म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. कारण पंजाबने वानखेडेवर मुंबईला पराभवाची धूळ चारली होती. अर्शदीप सिंगने यजमानांच्या स्वप्नांचा चुराडा करत दोन स्टम्प तोडले होते. पण कालच्या सामन्यात इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी आपल्या मागच्या पराभवाचा बदला घेतला. पंजाबचा मुख्य गोलंदाज अर्शदीप सिंगने तर त्याच्या ३.५ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या. 

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा काल खातेही न उघडता तंबूत परतला. रोहितने ३ चेंडू खेळले पण त्याला एकही धाव काढता आली नाही आणि ऋषी धवनने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. रोहित बाद झाल्यानंतर पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीने ट्विटच्या माध्यमातून त्याची खिल्ली उडवली. 'रो शून्य' आणि हसण्याची इमोजी शेअर करून पंजाबने रोहितच्या विकेटवर प्रतिक्रिया दिली. याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितच्या नेतृत्वात जिंकलेल्या पाच ट्रॉफींची आठवण करून दिली आणि पंजाबच्या संघाला एकदाही किताब पटकावता आला नाही याची जाणीव करून दिली. 

पंजाबचा घरच्या मैदानावर पराभव कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाने सावध खेळी करून साजेशी सुरूवात केली. मुंबईचा संघ सामन्यात पकड बनवत असताना लियाम लिव्हिंगस्टोन पाहुण्या संघासाठी काळ ठरला. त्याने ४१ चेंडूत ७५ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. जितेश शर्माने देखील (४७) धावांची खेळी करून मुंबईसमोर २०० पार आव्हान ठेवले. पंजाबने निर्धारित २० षटकांत ३ बाद २१४ धावा करून मुंबईला २१५ धावांचे तगडे आव्हान दिले. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला कर्णधार रोहित शर्माच्या (०) रूपात मोठा झटका बसला. पण इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पंजाबची डोकेदुखी वाढवली. दोघांनी १०० हून अधिक धावांची भागीदारी नोंदवून विजयाकडे कूच केली. सूर्याने ३१ चेंडूत ६६ तर इशानने ४१ चेंडूत ७५ धावांची अप्रतिम खेळी केली. अखेरच्या षटकांत या जोडीला बाद करण्यात पंजाबला यश आले. पण टीम डेव्हिड नाबाद (१९) आणि तिलक वर्माने नाबाद (२६) धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सपंजाब किंग्सरोहित शर्माट्रोल
Open in App