Join us  

IPL 2024 Auction: एक चूक पंजाबला महागात पडली अन् नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं

आयपीएल लिलावात परदेशी खेळाडूंवर मोठी लागली तर स्टार्क आणि कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ऐतिहासिक कमाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 1:26 PM

Open in App

IPL 2024 Auction: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत असून, मंगळवारी यासाठी मिनी लिलाव पार पडला. परदेशी खेळाडूंवर मोठी लागली तर स्टार्क आणि कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ऐतिहासिक कमाई केली. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा (२४.७५ कोटी) खेळाडू ठरला. स्टार्कला केकेआरच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. मात्र, या लिलावादरम्यान पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीसोबत असे काही झाले ज्यामुळे एकच हशा पिकला. खरं तर पंजाबच्या फ्रँचायझीला नको असताना देखील जबरदस्ती एका खेळाडूची खरेदी करावी लागली. 

लिलावादरम्यान ऑक्शनर मल्लिका सागरने छत्तीसगडकडून खेळणाऱ्या ३२ वर्षीय शशांक सिंगच्या नावाची घोषणा केली. शशांकसाठी सर्वप्रथम पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीने बोली लावली. लक्षणीय बाब म्हणजे शशांकसाठी बोली लावणारी पंजाबची एकमेव फ्रँचायझी होती. मग त्यांनी त्याला त्याच्या मूळ किंमतीसह (२० लाख) आपल्या संघात घेतले. पण, पंजाबला दुसऱ्याच खेळाडूला खरेदी करायचे होते. चूक लक्षात येताच त्यांनी ऑक्शनरला ही बाब सांगितली देखील पण काहीच फायदा झाला नाही. चुकून आम्ही शशांकला खरेदी केले असल्याचे पंजाबनं सांगितलं. परंतु, नियमानुसार एकदा खरेदी झाल्यानंतर निर्णय बदलला जात नाही. त्यामुळे पंजाबला नको असताना देखील शशांकला खरेदी करावे लागले. शशांक सिंगचा प्रवास लिलावात नाट्यमय घडामोड झाली असली तरी अष्टपैलू शशांक सिंग पंजाब किंग्सच्या जर्सीत दिसणार आहे. तो या आधी सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. हैदराबादने रिलीज केल्यानंतर शशांक लिलावाच्या रिंगणात आला. आयपीएल २०२३ साठी तो अनसोल्ड राहिला होता. शशांकने आतापर्यंत १० आयपीएल सामने खेळले असून ६९ धावा केल्या आहेत. 

आयपीएल २०२४ साठी पंजाबचा संघ -रिटेन केलेले खेळाडू - शिखर धवन ( कर्णधार ), जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, ऋषी धवन, प्रभसिमरन सिंग, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत बराड, राहुल चाहर, कगिसो रबाडा, नाथन एलिस, शिवम सिंग, हरप्रीत भाटिया, विदवथ कावेरप्पा. 

लिलावात खरेदी केलेले खेळाडू - हर्षल पटेल ( ११.७५ कोट ), ख्रिस वोक्स ( ४.२ कोटी ), आशुतोष शर्मा ( २० लाख ), विश्वनाथ प्रताप सिंग ( २० लाख ), शशांक सिंग ( २० लाख ),  प्रिंस चौधरी ( २० लाख ), तनय त्यागराजन ( २० लाख ), रिले रौसोव ( ८ कोटी ). 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२३पंजाब किंग्स