Join us  

पुढील दोन महिन्यांत मला भारतीय संघासोबत काही आठवणी तयार करायच्या आहेत - रोहित

भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात एका नवीन अध्यायाला सामोरा जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 6:04 PM

Open in App

भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात एका नवीन अध्यायाला सामोरा जाणार आहे. मागील दहा वर्षांपासून असलेला आयसीसी ट्रॉफीचा 'दुष्काळ' संपवण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियावर आहे. त्यामुळं साहजिकच कर्णधार हिटमॅनवर दबावाचा भडीमार असेल. पण, दबाव चांगल्या पद्धतीनं हाताळून तमाम भारतीयांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तो कशी पार पडतो हे पाहण्याजोगं असेल. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून यजमान संघ ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरूवात करेल. 

वन डे विश्वचषकातील सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पीटीआय या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. मला स्वतःला कसं रिलॅक्स ठेवता येईल याची मी काळजी घेतो, मी बाहेरील बाबींचा जास्त विचार करत नाही. मग ते सकारात्मक असो की नकारात्मक. मला सर्व काही बंद करायचं आहे, असं रोहितनं सांगितलं. 

संघ निवडीबाबत रोहित म्हणाला की, जर एखाद्या खेळाडूला संघाबाहेर केलं तर याचा अर्थ असा नाही की त्याला पसंत करत नाही. अशा गोष्टींचा विचार करून कर्णधारपद सांभाळलं जात नाही. कर्णधार असलो म्हणून वैयक्तिक मतं चालतात असं नाही. जर एखादा खेळाडू संघाबाहेर झाला तर त्यामागं काही कारणं असतात,  त्याला मी काहीच करू शकत नाही. तसेच या संघासोबत पुढच्या दोन महिन्यात मला काही आठवणी तयार करायच्या असल्याचं रोहितनं नमूद केलं.  विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App