वनडे इतिहासात सचिन शिवाय कुण्याही गोलंदाजाला जमला नाही असा महापराक्रम; तुमचा विश्वास बसणार नाही

सचिनने केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही काही मोठे विक्रम केले आहेत. जे आजवर कुणीही मोडू शकलेले नाही. एक मोठा विक्रम तर त्याने तब्बल दोन वेळा केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:26 AM2024-01-16T11:26:32+5:302024-01-16T11:27:46+5:30

whatsapp join usJoin us
In ODI history no bowler except Sachin has achieved this feat; You won't believe it | वनडे इतिहासात सचिन शिवाय कुण्याही गोलंदाजाला जमला नाही असा महापराक्रम; तुमचा विश्वास बसणार नाही

वनडे इतिहासात सचिन शिवाय कुण्याही गोलंदाजाला जमला नाही असा महापराक्रम; तुमचा विश्वास बसणार नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सचिन तेंदुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. तो क्रिकेट इतिहासातील काही महान फलंदाजांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकरने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेवाद्वितीय खेळाडू आहे. मात्र सचिनने केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही काही मोठे विक्रम केले आहेत. जे आजवर कुणीही मोडू शकलेले नाही. एक मोठा विक्रम तर त्याने तब्बल दोन वेळा केला आहे. 

खरे तर सचिन तेंडुलकर हा जगातील असा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने 50 व्या अर्थात अखेरच्या षटकात 6 अथवा त्याहून कमी धावांचा शशस्वी बचाव केला आहे. तेंडुलकरने हा विक्रम सर्वप्रथम 1993 मध्ये हीरो कपच्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. या सामन्यात तेंडुलकरने 6 धावांचा बचाव करताना केवळ दोनच धावा देत भारताला विजय मिळवून दिला होता.

यानंतर तेंडुलकरने असाच पराक्रम केला 1996 मध्ये खेळल्या गेलेल्या टायटन कप मध्ये. अशा पद्धतीने सचिन तेंडुलकर हा दोन वेळा एक दिवसीय सामन्यात 6 अथवा त्याहून कमी धवांचा बचाव करणारा जगातील पहिलाच गोलंदाज आहे. 

गोलंदाज म्हणूनही सचिनने भारतासाठी केले आहेत अनेक मोठे विक्रम -
- एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. या अनुभवी खेळाडूने 1998 मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट घेतल्या होत्या.
- सचिन तेंडुलकर हा भारतासाठी एकदिवसीय सामन्यात विकेट घेणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. त्याने 17 वर्ष 224 दिवसांचा असताना एकदिवसीय सामन्या विकेट घेतली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 हून अधिक बळी - 
सचिन तेंडुलकरने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 च्या 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 416 डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याने 46.53 च्या सरासरीने एकूण 201 बळी मिळवले आहेत.
 

Web Title: In ODI history no bowler except Sachin has achieved this feat; You won't believe it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.