पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद 

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:46 PM2023-03-03T17:46:20+5:302023-03-03T17:46:52+5:30

whatsapp join usJoin us
'In Pakistan, people were saying...': Team India Captain Rohit Sharma gives hilarious response when asked about Indore's pitch | पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद 

पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटीत जबरदस्त कमबॅक करताना ९ विकेट्सने बाजी मारली आणि र्डर गावस्कर ट्रॉफीत १-२ अशी पिछाडी कमी केली. भारताचे ७६ धावांचे लक्ष्य ऑसींनी सहज पार केले. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथने ( Steve Smith) सक्षमपणे सांभाळले. या सामन्यात खेळपट्टीबाबत बरीच चर्चा रंगली. कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत ३० विकेट्स पडल्या आणि आता ICC काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रोहित शर्माने ( Rohit sharma) खेळपट्टीवरून विचारल्या गेलेल्या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिले.  

Qualification scenario for India for WTC final: ऑस्ट्रेलियाने फायनल गाठली; भारताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली, आता पाहा गणित 

भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला अन् दुसऱ्या डावात १६३ धावाच त्यांना करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावा केल्या. रवींद्र जडेजा ( ४-७८), आर अश्विन ( ३-४४) आणि उमेश यादव ( ३-१२) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. नॅथन लाएनने दुसऱ्या डावात ६४ धावांत ८ विकेट्स घेतल्या. ७६ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज पार केले.  मार्नस लाबुशेन व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक फटकेबाजी केली. हेडने ५३ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. लाबुशेनने नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १८.३ षटकांत १ बाद ७८ धावा करून सामना जिंकला.

या सामन्यानंतर रोहितला खेळपट्टीबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले. ''भारताबाहेरही पाच दिवस कसोटी सामना चालत नाही. दक्षिण आफ्रिकेत तीन दिवसांत कसोटी सामना संपला. पाकिस्तानात तर लोकं कसोटी क्रिकेटला कंटाळवाणं म्हणत आहेत, आम्ही तर काही गोष्टी इंटरेस्टिंग करतोय. इंदूरच्या खेळपट्टीबाबत खूपच चर्चा होतेय. जेव्हा जेव्हा भारतात सामना असतो तेव्हा सर्व लक्ष खेळपट्टीवर केंद्रीत केले जाते. लोकं नॅथन लाएलबद्दल का मला विचारत नाहीत? त्याने कशी गोलंदाजी केली? पुजाराने दुसऱ्या डावात किती चांगली फलंदाजी केली, उस्मान ख्वाजा कसा खेळला? हे प्रश्न का विचारले जात नाही?.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: 'In Pakistan, people were saying...': Team India Captain Rohit Sharma gives hilarious response when asked about Indore's pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.