GT vs KKR Live : पांड्याच्या जागी मिळाली संधी! विजयशंकरनं केलं सोनं; 9 चेंडूत ४६ धावा करून उभारला धावांचा डोंगर

GT vs KKR : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 05:19 PM2023-04-09T17:19:39+5:302023-04-09T17:19:49+5:30

whatsapp join usJoin us
 In the 13th match of IPL 2023, Gujarat Titans have set Kolkata Knight Riders a target of 205 runs on the strength of Sai Sudarshan's 53 runs and Vijay Shankar's 63 runs  | GT vs KKR Live : पांड्याच्या जागी मिळाली संधी! विजयशंकरनं केलं सोनं; 9 चेंडूत ४६ धावा करून उभारला धावांचा डोंगर

GT vs KKR Live : पांड्याच्या जागी मिळाली संधी! विजयशंकरनं केलं सोनं; 9 चेंडूत ४६ धावा करून उभारला धावांचा डोंगर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya and rashid Khan । अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान गुजरात टायटन्सने शानदार सुरूवात केली. रिद्धीमान साहा स्वस्तात परतल्यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी डाव सावरला. सांघिक खेळीच्या जोरावर गुजराने निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ धावा केल्या. युवा साई सुदर्शनने ३८ चेंडूत ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये विजयशंकरच्या स्फोटक खेळीमुळे गुजरातने धावांचा डोंगर उभारला. 

हार्दिक पांड्याच्या जागी संधी मिळालेल्या विजयशंकरने २४ चेंडूत नाबाद ६३ धावा करून केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने त्याच्या खेळीत एकूण ५ षटकार आणि ४ चौकार ठोकले. एकूणच विजयशंकरने अवघ्या ९ चेंडूत षटकार आणि चौकारांच्या मदतीने ४६ धावा कुटल्या. त्याच्या व्यतिरिक्त शुबमन गिल (३९) आणि साई सुदर्शन (५३) यांनी धावसंख्या २०० पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. केकेआरकडून सुनिल नरेनने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर युवा सुयश शर्माला १ बळी घेण्यात यश आले. 

खरं तर गुजरातच्या संघाचे नेतृत्व आज राशिद खानकडे आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्याची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असून पांड्याच्या जागी विजय शंकरला संधी मिळाली आहे. राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार पांड्याची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याचे राशिद खानने म्हटले. आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सच्या घरच्या मैदानावर खेळवला जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title:  In the 13th match of IPL 2023, Gujarat Titans have set Kolkata Knight Riders a target of 205 runs on the strength of Sai Sudarshan's 53 runs and Vijay Shankar's 63 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.