जिओच्या 'यॉर्कर'वर Hotstar 'क्लीन बोल्ड'; IPL नसल्याने तीन महिन्यांत मोठं नुकसान

JioCinema या मूळ कंपनीने तब्बल २३, ७५८ कोटी रुपयांचे विशेष डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार खरेदी केल्यानंतर २०२३ मध्ये IPL प्रसारित करण्यास सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:51 PM2023-08-10T15:51:31+5:302023-08-10T15:52:22+5:30

whatsapp join usJoin us
In the April to June period, Disney + Hotstar lost 12.5 million (1.25 crore) paid customers, due to the IPL absence | जिओच्या 'यॉर्कर'वर Hotstar 'क्लीन बोल्ड'; IPL नसल्याने तीन महिन्यांत मोठं नुकसान

जिओच्या 'यॉर्कर'वर Hotstar 'क्लीन बोल्ड'; IPL नसल्याने तीन महिन्यांत मोठं नुकसान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एप्रिल ते जून या कालावधीत Disney + Hotstar ने १२.५ दशलक्ष (१.२५ कोटी) ग्राहक गमावले. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या अनुपस्थितीमुळे भारतातील शीर्ष streaming service पुरवणारी कंपनी ग्राहक गमावत आहे. असे असले तरी मूळ कंपनी द वॉल्ट डिस्ने कंपनी भारतातील ऑपरेशन्स विकण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. डिस्नेच्या भारत-केंद्रित OTT प्लॅटफॉर्मने (डिस्ने + हॉटस्टार) एप्रिल-जून तिमाहीत ४०.४ दशलक्ष ग्राहक गमावले आहेत, जी त्याच्या आधीच्या तिमाहीत ५२.९ दशलक्ष होती. जवळपास २४ टक्के ग्राहक गमावले आहेत.  


आशियातील ६१.३ दशलक्ष लोक सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस डिस्ने + हॉटस्टारचे सदस्य होते. त्यातील बहुतांश लोक भारतातले आहेत, ज्यामुळे ही कंपनी अव्वल स्ट्रीमर बनली होती. प्रतिस्पर्ध्यांना Amazon Prime Video (सुमारे २० दशलक्ष) आणि Netflix (सुमारे ६-७ दशलक्ष) यांचे सदस्य कमी होते. केविन लॅन्सबेरी, अंतरिम मुख्य आर्थिक अधिकारी यांनी  सांगितले, “डिस्ने + हॉटस्टार सदस्यांनी या तिमाहीत नकार दिला कारण आम्ही आमचे उत्पादन आयपीएल केंद्रस्थानी न ठेवता इतर खेळ आणि मनोरंजन ऑफरसह संतुलित केले. मला हे देखील लक्षात आले आहे की, डिस्ने+ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी ARPU असलेला हा व्यवसाय आमच्या एकूण D2C आर्थिक परिणामांचा भौतिक घटक नाही.” 


Core Disney+ च्या $६.५८ च्या तुलनेत Disney + Hotstar प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (average revenue per user (ARPU)) $०.५९होता. यातला बहुतेक भाग हा आयपीएलमुळे येत होता, परंतु त्यानंतर २०२३-२७ च्या कालावधीसाठी त्यांनी आयपीएल डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार गमावले. रिलायन्सच्या Viacom18ने हे हक्क जिंकले अन् त्यांनी सर्वांना मोफत आयपीएल दाखवली. तेव्हापासून डिस्ने + हॉटस्टारचे नशीब बदलले आहे. सप्टेंबर २०२२च्या अखेरीपासून त्यांच्या ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत आहे, केवळ नऊ महिन्यांत एकूण २० दशलक्षाहून अधिक ग्राहक गमावले आहेत.   


JioCinema या मूळ कंपनीने तब्बल २३, ७५८ कोटी रुपयांचे विशेष डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार खरेदी केल्यानंतर २०२३ मध्ये IPL प्रसारित करण्यास सुरुवात केली. मुकेश अंबानी-समर्थित अॅपने ३.२ कोटी ( ३२ दशलक्ष) समवर्ती दर्शक नोंदवले आहेत.
 

Web Title: In the April to June period, Disney + Hotstar lost 12.5 million (1.25 crore) paid customers, due to the IPL absence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.