कोलकाता - बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बुधवारी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली होती. गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा अर्थही त्या ट्वीटमधून काढला गेला होता. दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सौरव गांगुली यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता स्वत: सौरव गांगुली यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत सर्व चर्चांना पूर्णविराम देताना सौरव गांगुली यांनी सांगितले की, मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच अन्य कुठलीही बाब नाबी, मी एक एज्युकेशन अॅप वर्ल्ड वाइड लॉन्च करत आहे. त्याबाबत अन्य काही गोष्ट नाही.
दरम्यान, आज संध्याकाळी सौरव गांगुली यांनी केलेल्या एका ट्विटमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. या ट्विटमध्ये गांगुलींनी म्हटले होते की, ट्विटमध्ये लिहिले की, १९९२ मध्ये मी क्रिकेटमधील माझा प्रवास सुरू केला होता. २०२२ मध्ये माझ्या क्रिकेट कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटमुळे तुम्हा सर्वांचा पाठिंबा मला मिळाला आहे. मी प्रत्येक पाठीराख्याचे आभार मानतो. आज मी एक अशी गोष्ट सुरू करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे अनेक लोकांना फायदा होईल, अशी मला अपेक्षा आहे. माझ्या जीवनातील या नव्या अध्यायामध्ये तुमचा पाठिंबा मला मिळेल, अशी मला अपेक्षा आहे, असे या पोस्टमध्ये गांगुलींनी म्हटले होते. त्यामुळे आता सौरव गांगुली हे क्रिकेट सोडून राजकीय मैदानात नवी इनिंग सुरू करणार का, अशी चर्चा सुरू झाली होती.
Web Title: In the end, it was Sourav Ganguly who put an end to all discussions and made a big announcement about the new innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.