भारतात सुरू असलेल्या वन डे विश्वचषकात पाकिस्तानी संघाला म्हणावे तसे यश मिळवता आले नसले तरी शेजाऱ्यांनी उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आपले स्थान कायम ठेवले आहे. मंगळवारी बांगलादेशचा पराभव करून बाबर आझमच्या संघाने तिसरा विजय मिळवला. सलगच्या चार पराभवानंतर पाकिस्तानला हा सुखद धक्का बसला. अशातच सांघिक खेळ करण्यात अयशस्वी ठरत असलेल्या पाकिस्तानला आयसीसीने खुशखबर दिली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला असून शाहीन आफ्रिदीने देखील बाजी मारली आहे.
आयसीसी वन डे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम ८१६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर त्याच्या पाठोपाठ भारताच्या शुबमन गिलचा नंबर लागतो. गिलचे एकूण ८१६ गुण असून तो बाबरपेक्षा केवळ २ गुणांनी मागे आहे. त्यामुळे जगात नंबर वन येण्याची गिलला सुवर्णसंधी आहे. या यादीत क्विंटन डी कॉक (७६५) आणि डेव्हिड वॉर्नर (७६१) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (७४३) गुणांसह पाचव्या स्थानी आहे, तर विराट कोहली (७३५) गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
ICC वन डे क्रमवारीतील पहिले पाच फलंदाज -
बाबर आझम (पाकिस्तान) - ८१८ गुण
शुबमन गिल (भारत) - ८१६ गुण
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) - ७६५ गुण
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - ७६१ गुण
रोहित शर्मा (ऑस्ट्रेलिया) - ७४३ गुण
पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी ६७३ गुणांसह वन डे क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल आहे. त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवुड आहे, ज्याचे गुण ६६३ आहेत. भारताचा मोहम्मद सिराज (६५६) गुणांसह तिसऱ्या स्थानी स्थित आहे. भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवचा देखील टॉप-१० मध्ये समावेश असून तो ६४६ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
ICC वन डे क्रमवारीतील पहिले पाच गोलंदाज -
शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान) - ६७३ गुण
जोश हेझलवुड (ऑस्ट्रेलिया) - ६६३ गुण
मोहम्मद सिराज (भारत) - ६५६ गुण
केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) - ६५१ गुण
ट्रेन्ट बोल्ट (न्यूझीलंड) - ६४९ गुण
Web Title: In the ICC ODI Rankings, Babar Azam is first in the list of batsmen, Shubman Gill is second, Rohit Sharma is fifth and Virat Kohli is seventh and Shaheen Afridi is first in the list of bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.