Join us  

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये या गोलंदाजांने ओकली आग, प्रतिस्पर्धी संघ अवघ्या ४९ धावांत गारद

Ranji Trophy: सध्या सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात एका युवा गोलंदाजाने भेदक गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 4:30 PM

Open in App

सध्या सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात एका युवा गोलंदाजाने भेदक गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उत्तराखंडच्या दीपक धपोला याने ८ विकेट्स घेत हिमाचल प्रदेशच्या संघाला अवघ्या ४९ धावांत गुंडाळले.

या सामन्यात हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषी धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय विशेष फायदेशीर ठरला नाही. हिमाचलची फलंदाजी उत्तराखंडचा युवा गोलंदाज दीपक धपोला याच्या भेदक माऱ्यासमोर कोलमडली आणि त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या ४९ धावांत गारद झाला.  हिमाचल प्रदेशकडून सर्वाधिक २६ धावा केल्या. तर उत्तराखंडकडून दीपक धपोला याने ८ बळी टिपले. तर अभय नेगीने दोन बळी टिपले.

उत्तराखंडकडून दीपक घपोला याने भेदक मारा करताना ८.५ षटकात ३५ धावा देत ८ गडी टिपले. त्याने हिमाचलच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. हिमाचलचे ५ फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत. तर उर्वरित ५ जणांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. केवळ एकाच फलंदाजाला २६ धावा काढता आल्या.

प्रत्युत्तरदाखल उत्तराखंडच्या संघाने ६ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारली होती. आदित्य तारे २१ आणि अभय नेगी १० धावांवर खेळत होते.  

टॅग्स :रणजी करंडकउत्तराखंडहिमाचल प्रदेश
Open in App