Join us  

भुवनेश्वर कुमारचा 'क्लास', अचानच चेंडूनं मार्ग बदलला अन् त्रिफळा उडाला, VIDEO

UP T20 2023 Bhuvneshwar Kumar : उत्तर प्रदेशात सध्या यूपी ट्वेंटी-२० लीगचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 5:39 PM

Open in App

UP T20 2023 : उत्तर प्रदेशात सध्या यूपी ट्वेंटी-२० लीगचा थरार रंगला आहे. बुधवारी नोएडा सुपर किंग्ज आणि कानपूर सुपर स्टार्स यांच्यात सामना झाला. नोएडाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने या सामन्यात आपला क्लास दाखवला. भारतीय संघातून बाहेर असलेल्या भुवीने मागील नोव्हेंबरपासून एकही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. पण, यूपी ट्वेंटी-२० लीगमध्ये त्याला पहिल्याच सामन्यात दोन बळी घेण्यात यश आले. 

कानपूर सुपरस्टार्सविरुद्ध लीगच्या सुरुवातीच्या सामन्यात भुवनेश्वरने साजेशी कामगिरी केली. या स्पेलमुळे सुपर किंग्जचा १६ धावांनी विजय झाला. भुवनेश्वरला पहिला बळी लेन्थ बॉलवर मिळाला होता. चेंडू जमिनीवर आदळताच त्याचा मार्ग अचानक बदलला. पुढे त्याने सुपरस्टार्सचा कर्णधार अक्षदीप नाथलाही बाहेरचा रस्ता दाखवला. हा चेंडू पाहून चाहत्यांना जुन्या भुवनेश्वर कुमारची आठवण झाली.

दरम्यान, भुवनेश्वर कुमार मागील मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएल २०२३ मध्ये भुवीने २६.५६ च्या सरासरीने १६ बळी घेतले होते. सनरायझर्स हैदराबादसाठी त्याने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात सर्वाधिक बळी घेतले. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित उत्तर प्रदेश ट्वेंटी-२० लीग ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 

 

टॅग्स :भुवनेश्वर कुमारउत्तर प्रदेशटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ
Open in App