Join us  

क्रिकेटपटूंसाठी आयकर विभागाची फिल्डिंग; बक्षिसे, गिफ्ट आणि बक्कळ कमाई... कितीही मोठा असला तरी...

विश्वचषकासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 7:40 AM

Open in App

अर्जुन : कृष्णा, सध्या क्रिकेट विश्वकप चालू असताना खेळाडू त्यांची कामगिरी आणि कमाईमुळे चर्चेत आहेत. आयकर विभागाच्या गुंतागुंतींना ते कसे सामोरे जातील? कृष्णा : अर्जुन, क्रिकेट हा भारतातील एक खेळच नसून तो जवळपास एक राष्ट्रप्रेम बनला आहे. यात लोकांची भावनात्मक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात असते.विश्वचषकासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक असते. यामुळे आयकर विभाग खेळाडूंच्या कमाईवर लक्ष ठेवतो. जसे खेळाडूंनी आपल्या मैदानावरील कामगिरीबाबत सावध राहिले पाहिजे तसेच त्यांच्या आयकरबाबतही सावध असणे गरजेचे आहे.

अर्जुन : कृष्णा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंजूर केलेल्या उत्पन्नावर कराची पडताळणी कशी होते?कृष्णा : अर्जुन, जर विश्वचषकासारख्या स्पर्धेला भारत सरकारकडून विशेष मान्यता असेल, तर अशा स्पर्धांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर कायद्याच्या कलम १०(३९) अंतर्गत करमुक्ती असू शकते.अर्जुन : कृष्णा, व्यावसायिक आयपीएल क्रिकेट स्पर्धा, स्थानिक स्पर्धा आदींबद्दल काय?कृष्णा : अर्जुन, आयपीएल संघाच्या मालकांनी दिलेली फी ही आयकराच्या अधीन आहे. क्रिकेटपटूंना फीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांना लागू असलेल्या आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागेल.

अर्जुन : कृष्णा, मॅच फीस सोडून क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या अन्य कमाईवर कर कसा लावला जातो?कृष्णा : अर्जुन, अशा कमाईला व्यावसायिक उत्पन्न मानले आणि खेळाडूंना त्यानुसार कर भरावा लागतो.अर्जुन : कृष्णा, विश्वचषकादरम्यान मिळालेल्या बक्षिसे आणि पुरस्कारांचे काय? कृष्णा : अर्जुन, सरकारने जाहीर केलेली बक्षिसे जर आयकर नियमांतर्गत मिळाली असतील तर ती करमुक्त असू शकतात. प्रायोजकांकडून मिळालेली मोटारसायकल किंवा कार अशी बक्षिसे ही करपात्र असतात.

अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा? कृष्णा : अर्जुन, ज्याप्रमाणे क्रिकेटमधील प्रत्येक चेंडूचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो, त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूने आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत निश्चित केला पाहिजे. आयकर आणि जीएसटी रिटर्न वेळेवर आणि अचूक दाखल करणे, हे प्रत्येक खेळाडूचे कर्तव्य आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्सवन डे वर्ल्ड कप