Join us  

नवे निवड समिती प्रमुख विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या भविष्याचा निर्णय घेणार; ६ खेळाडूंना डच्चू?

बीसीसीआयने सध्या निवड समिती प्रमुखासाठी अर्ज मागवले आहेत. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर निवड समिती प्रमुखपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 1:16 PM

Open in App

भारतीय संघ स्थित्यंतराच्या वळणावर आहे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियातील बऱ्याच सीनियर खेळाडूंना नारळ दिला जाऊ शकतो. बीसीसीआयने सध्या निवड समिती प्रमुखासाठी अर्ज मागवले आहेत. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर निवड समिती प्रमुखपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. नवीन निवड समिती प्रमुखावर पहिली जबाबदारी ही संघातील सीनियर खेळाडूंसोबत त्यांच्या भविष्याबाबत बोलण्याची असणार आहे. रोहित शर्माविराट कोहली यांना वन डे वर्ल्ड कपनंतर कदाचीत ट्वेंटी-२० कारकीर्दिबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे आणि निवड समिती प्रमुख त्यांच्याशी संवाद साधणार आहे.  

भारतीय क्रिकेटच्या दोन दिग्गजांच्या खेळाच्या सर्वात लहान स्वरूपातील संक्रमणाबद्दल बरीच चर्चा झाली आहे. विराट कोहली ३४ आणि रोहित शर्मा ३६ वर्षांचा आहे. “मुख्य निवडकर्त्याचे एक काम म्हणजे खेळाडूंशी त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणे. रोहित आणि विराट यांचाही त्यात समावेश आहे. होय, आम्ही त्यांना पाहिजे तोपर्यंत खेळू देऊ इच्छितो, परंतु सर्व महान खेळाडूंना त्यांच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ असते. तीन फॉरमॅट आणि आयपीएल खेळणे सोपे काम नाही,'' असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले.  

बीसीसीआयने वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लगेचच ट्वेंटी-२० आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, हार्दिक पांड्या औपचारिकपणे ट्वेंटी-२० व वन डे संघाचे कर्णधारपद स्वीकारेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी २० खेळाडूंचा मुख्य संघ तयार करण्याची योजना आहे आणि रोहितपैकी कोणीही या योजनेत सहभागी होण्याची शक्यता नाही. पण कोहलीच्या फिटनेसचा विचार करता त्याला संधी मिळू शकते. मुख्य निवडकर्ता आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी त्या विषयावर बोलल्यानंतर हे स्पष्ट होईल.  

भारताच्या पुढील FTP नुसार भारतीय संघ ६१ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. “साहजिकच, वर्ल्ड कपनंतर सर्व लक्ष ट्वेंटी-२० क्रिकेटवर वळणार आहे. २००७ पासून आम्ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही. आयपीएलमधून ज्या प्रकारचे खेळाडू येत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला नाही, तर ते चांगेल वाटणार नाही. निवड समिती वन डे वर्ल्ड कपनंतर लवकरच त्यावर ब्लू प्रिंट तयार करेल, ” असे अधिकारी पुढे म्हणाले. 

ट्वेंटी-२० संघातून कोणाला मिळू शकतो डच्चू?  रोहित शर्माविराट कोहली  रविचंद्रन अश्विनमोहम्मद शमीभुवनेश्वर कुमारकेएल राहुल 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहली
Open in App