Incredible catch : रोहित शर्माची डाईव्ह, सुपरमॅन इशान किशन अन् शार्दूल ठाकूरची विरुद्ध दिशेनं धाव; पाहा तीन अफलातून कॅचचा Video 

India vs West Indies, 3rd T20I : रोहित, इशान किशन आणि शार्दूल ठाकूर यांनी घेतलेले हे झेल, तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चाहत्यांच्या पसंतीत उतरले.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 10:29 AM2022-02-21T10:29:34+5:302022-02-21T10:29:58+5:30

whatsapp join usJoin us
Incredible catch by Rohit Sharma, Ishan Kishan holds his nerve to take a swirler and Shardul Thakur's superb running catch, Watch Video  | Incredible catch : रोहित शर्माची डाईव्ह, सुपरमॅन इशान किशन अन् शार्दूल ठाकूरची विरुद्ध दिशेनं धाव; पाहा तीन अफलातून कॅचचा Video 

Incredible catch : रोहित शर्माची डाईव्ह, सुपरमॅन इशान किशन अन् शार्दूल ठाकूरची विरुद्ध दिशेनं धाव; पाहा तीन अफलातून कॅचचा Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 3rd T20I : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला. वन डे मालिकेपाठोपाठ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिकेतही ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या सामन्यात तीन अफलातून कॅचही पाहायला मिळाल्या. रोहित, इशान किशन आणि शार्दूल ठाकूर यांनी घेतलेले हे झेल, तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चाहत्यांच्या पसंतीत उतरले.. 

ऋतुराज गायकवाड व रोहित शर्मा यांना अपयश आले.  श्रेयस अय्यर ( २५) व इशान किशन ( ३४) यांनी टीम इंडियाची गाडी रुळावर आणल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर  या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. 

सूर्यकुमार यादव व वेंकटेश अय्यर यांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. दीपक चहर ( २-१५), वेंकटेश अय्यर ( २-२३) व शार्दूल ठाकूर ( २-३३) यांनीही कमाल गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून  निकोलस पूरन ४७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ६१ धावा आणि रोवमन शेफर्ड २९ धावा करताना संघर्ष केला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रोवमन पॉवेलचा सुरेख झेल शार्दूलने टिपला. विरुद्ध दिशेला धावत चेंडूवर नजर ठेऊन शार्दूलने हा झेल घेतला. त्यानंतर १८व्या षटकात इशान किशनने निकोलस पूरनचा झेल सुपरमॅन झेल घेतला आणि २०व्या षटकात रोहित शर्माने डाईव्ह मारताना डॉमिनिक ड्रॅक्सचा झेल घेतला.

पाहा व्हिडीओ...



Web Title: Incredible catch by Rohit Sharma, Ishan Kishan holds his nerve to take a swirler and Shardul Thakur's superb running catch, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.