'मिडल स्टम्प' उखडला, तरीही अम्पायरने दिले नाही बाद; तुम्हीच सांगा Out की Not Out

क्रिकेटमध्ये अनेकदा बरेच मजेशीर, वादग्रस्त प्रसंग घडत असतात... त्यावर चर्चाही खूप रंगते..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:20 AM2023-12-11T10:20:23+5:302023-12-11T10:20:44+5:30

whatsapp join usJoin us
Incredible Scenes as Middle Stump Knocked Back But Batter Given Not Out, now u decied batter out or not out | 'मिडल स्टम्प' उखडला, तरीही अम्पायरने दिले नाही बाद; तुम्हीच सांगा Out की Not Out

'मिडल स्टम्प' उखडला, तरीही अम्पायरने दिले नाही बाद; तुम्हीच सांगा Out की Not Out

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटमध्ये अनेकदा बरेच मजेशीर, वादग्रस्त प्रसंग घडत असतात... त्यावर चर्चाही खूप रंगते.. असाच एक प्रसंग नुकताच घडला आहे आणि सोशल मीडियावर त्याची हवा आहे. अम्पायरने दिलेला एक निर्णय सध्या वादात सापडला आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्यात मिडल स्टम्प उखडला गेल्यानंतरही अम्पायरने फलंदाजाला नाबाद दिले. तिन्ही यष्टींपैकी मधली यष्टी उखडली होती, पण बेल्स जशाच्यातश्या होत्या. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  


अनेक लोकांचे असे मत आहे की अम्पायरने दिलेला निर्णय योग्य आहे, कारण स्टम्प पूर्णपणे उखडले नाहीत किंवा जमिनीवर पडले नाहीत. दुसरीकडे, अनेकांनी अम्पायरला शिव्या दिल्या आणि सांगितले की, जमिन इतकी घट्ट कोणी ठेवत नाही. मात्र, आता क्रिकेटचे नियम मधेच आले आहेत. कारण मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियमांमुळेच अशा वादग्रस्त मुद्द्यांचा अंत होतो.


एमसीसी क्रिकेट नियमांनुसार, बेल्स पूर्णपणे पडल्यास खेळाडू बाद होईल किंवा स्टम्प पूर्णपणे जमिनीतून बाहेर येतो आणि जर बेल्स हलली पण जमिनीवर पडली नाही तर निर्णय नॉट आउट दिला जातो. या सामन्यातही असेच काहीसे घडले कारण दोन्ही बेल्स खाली पडले नाहीत आणि स्टंप देखील पूर्णपणे मैदानाबाहेर आलेला नाही. अशा परिस्थितीत एमसीसीच्या नियमांचा विचार करून पंचांनी फलंदाजांना नॉट आऊट दिले, हा योग्य निर्णय होता.


 
२०१७ मध्ये अशीच एक घटना घडली होती, जिथे स्ट्रॅथमोर हाइट्स विरुद्ध मिड-इयर क्रिकेट असोसिएशन मॅचमध्ये फलंदाज जतिंदर सिंग त्याची विकेटही अशीच होती, पण अंपायरने त्याला आऊट दिला होता.
 

Web Title: Incredible Scenes as Middle Stump Knocked Back But Batter Given Not Out, now u decied batter out or not out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.