Join us

Challenge; अशी कॅच घेऊनच दाखवा, फुटबॉल किक अन् फलंदाज OUT!

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वत्र चर्चा आहे आणि असायलाच हवी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:33 IST

Open in App

मुंबई : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वत्र चर्चा आहे आणि असायलाच हवी. क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेकडे पाहिले जाते. पण, याचवेळी इंग्लंडमध्येच सुरू असलेल्या कौंटी क्रिकेटचीही हवा आहे. या स्पर्धेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन खेळत आहे आणि त्याच्या वेगाचा बोलबाला आहे. त्यानं टाकलेल्या चेंडूचा वेध घेण्यास फलंदाजाला अपयश आले आणि तो त्रिफळाचीत झाला. याच कौंटी क्रिकेटमध्ये मंगळवारी एक अश्यक्य झेल घेण्यात आला. यावेळी यष्टिरक्षकाने चक्क फुटबॉल किकद्वारे प्रतिस्पर्धी फलंदाजाला झेलबाद करून माघारी पाठवले. हा सामना कोणत्या क्लब्समधील हे समजले नसले तरी ती कॅच सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

फिरकी गोलंदाजाच्या चेंडूचा अंदाज बांधण्यात फलंदाज अपयशी ठरला आणि त्याच्या बॅटची कड घेत तो यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. मात्र, यष्टिरक्षकाच्या हातून तो निसटला पण, त्यानंतर जे घडलं हे पाहण्यासारखं होतं. यष्टिरक्षकानं अत्यंत चपळतेनं व चतुराईनं चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच त्याला किक मारली आणि सिली पॉईंटला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला. पंचांनी त्वरित फलंदाजाला बाद ठरवले. क्षणात घडलेल्या या प्रसंगाने काही काळ फलंदाजही आश्चर्यचकीत राहीला.

पाहा व्हिडीओ... 

असेच काहीशे झेल 

टॅग्स :कौंटी चॅम्पियनशिप