Join us  

कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर

या स्पर्धेत  भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदारही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:19 AM

Open in App

Emerging Teams Asia Cup Semi-Final 2 IND A vs AFG A Live Telecast And Streaming - भारत 'अ' विरुद्ध अफगानिस्तान 'अ' यांच्यात इमर्जिंग आशिया कप २०२४ स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. या लढती आधी श्रीलंका 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' (Sri Lanka A vs Pakistan A, Semi Final 1) हे दोन संघ पहिला उपांत्य सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. हा सामना शुक्रवारी, दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे. रविवारी, २७ ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

भारत 'अ' संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार

तिलक वर्माच्या नेृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकून जेतेपदाच्या लढतीसाठी अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारतीय संघाने या स्पर्धेत साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत  भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदारही आहे.  

कधी रंगणार भारत 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान 'अ' यांच्यातील सेमी फायनल लढत?

India A vs Afghanistan A यांच्यातील इमर्जिंग आशिया कप स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी, २५ ऑक्टोबरला अल अमेरात क्रिकेट ग्राउंड (मिनिस्ट्री टर्फ १) मैदानात खेळवण्यात येईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार, सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. 

  कुठं पाहता येईल हा सामना? (Emerging Teams Asia Cup Semi-Final 2 IND A vs AFG A Live Telecast And Streaming Live Telecast And Streaming Details)

भारतात स्टार स्पोर्ट्स १ या चॅनेलवर क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय डिस्ने+हॉटस्टारवरही हा सामना पाहता येईल.  

फायनलमध्ये भारत-पाक हायहोल्टेज रंगत पाहायला मिळणार?

इमर्जिंग आशिया कप स्पर्धेतील 'ब' भारत-पाकिस्तान दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेला मात दिली आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने बाजी मारली तर क्रिकेट चाहत्यांना फायनलमध्ये भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज लढत पाहायला मिळू शकते. साखळी फेरीत भारत-पाक यांच्यात रोमहर्षक लढत पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा तोच सीन फायनलमध्ये दिसला तर क्रिकेट चाहत्यांसाठी ती मोठी पर्वणीच असेल.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघतिलक वर्माअफगाणिस्तानएशिया कप 2023