ishan kishan news : मोठ्या कालावधीनंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली असून, इशान किशनची मोठ्या कालावधीनंतर संघात एन्ट्री झाली आहे. टीम इंडिया ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात असेल. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात ३१ ऑक्टोबरपासून दोन प्रथम श्रेणी (चार दिवसीय) सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सामन्यांनंतर टीम इंडिया आपल्या वरिष्ठ संघाविरुद्ध एक सामना खेळेल. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी इशानच्या कुटुंबीयांनी त्याला शुभेच्छा दिल्या. हा भावनिक क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मागील मोठ्या कालावधीपासून भारताच्या वरिष्ठ संघातून बाहेर असलेला इशान किशन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये दिसणार आहे. इशान किशनने मानसिक थकवा जाणवत असल्याचे सांगत क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकले नाही.
इशान किशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इशान पाटणाहून निघण्यापूर्वीचा आहे. इशान किशन पाटणाहून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघाला आहे. किशन गाडीत बसल्यानंतर त्याची आई आणि आजीने यष्टीरक्षक फलंदाजाचे चुंबन घेतले. यावेळी किशनचे संपूर्ण कुटुंब दिसले.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ वेळापत्रकपहिला सामना - ३१ ऑक्टोबर-३ नोव्हेंबर, मकायदुसरा सामना - ७ नोव्हेंबर-१० नोव्हेंबर, मेलबर्न भारत अ विरुद्ध वरिष्ठ भारतीय संघ, इन्ट्रा स्क्वॅड मॅच - १५-१७ नोव्हेंबर, पर्थ
भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन.