IND vs PAK : महाराष्ट्राच्या पोरासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले; Asia Cup मध्ये भारताने वर्चस्व गाजवले

IND A vs PAK A ACC Men's Emerging Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत राजवर्धन हंगर्गेकर ( Rajvardhan Hangargekar ) चमकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:35 PM2023-07-19T17:35:42+5:302023-07-19T17:36:28+5:30

whatsapp join usJoin us
IND A vs PAK A : Five wicket haul by Rajvardhan Hangargekar against Pakistan in Emerging Asia Cup, India need 206 to defeat Pakistan | IND vs PAK : महाराष्ट्राच्या पोरासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले; Asia Cup मध्ये भारताने वर्चस्व गाजवले

IND vs PAK : महाराष्ट्राच्या पोरासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले; Asia Cup मध्ये भारताने वर्चस्व गाजवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND A vs PAK A ACC Men's Emerging Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत राजवर्धन हंगर्गेकर ( Rajvardhan Hangargekar ) चमकला. महाराष्ट्राच्या या गोलंदाजाने पाच विकेट्स घेत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात कोलंबो येथे लढत सुरू आहे. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हंगर्गेकरने ८-१-४२-५ अशी अप्रितम स्पेल टाकून पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४८ षटकांत २०५ धावांत माघारी पाठवला. 


भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवून आधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.  सईम आयूब आणि साहिबजादा फरहान यांनी पाकिस्तानच्या डावाची सुरूवात केली. राजवर्धनने चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आयूबला ( ०) यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ओमेर युसूफ ( ०) यालाही जुरेलकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. फरहान व हसीबुल्लाह खान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला, परंतु रियान परागने महत्त्वाची विकेट घेतली. फरहान ( ३५) धावांवर झेलबाद झाला. मानव सुतारने त्याच्या तिसऱ्या षटकात कामरान घुलाम ( १५) ची आणि खान ( २७) यांची विकेट मिळवली आणि पाकिस्तानची अवस्था ५ बाद ७८ अशी केली. 

Image
त्यानंतर कासिम अक्रम ( ४८), मुबासिर खान ( २८) आणि मेहराम मुमताझ ( २५*) यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु राजवर्धनने त्यांना अपयशी ठरवले. मानव सुतारने ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर रियान पराग व निशांत सिंधू यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. 

Web Title: IND A vs PAK A : Five wicket haul by Rajvardhan Hangargekar against Pakistan in Emerging Asia Cup, India need 206 to defeat Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.