India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेश आणि भारत यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. वन डे मालिका जिंकल्यानंतर यजमान बांगलादेश कसोटीतही निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय संघ आधीच दुखापतीने ग्रस्त आहे. रोहित शर्मा ( पहिल्या कसोटीतून) मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांना बांगलादेशविरुद्धच्या वन डे व कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. उद्यावर पहिली कसोटी आली असताना भारताचा आणखी एक सलामीवीर दुखापत झाला आहे. रोहितच्या अनुपस्थिती कर्णधार लोकेश राहुलसह सलामीला शुबमन गिल ( Shubman Gill ) खेळण्याची शक्यता अधिक होती, परंतु आजच्या सराव सत्रात गिलला दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
गिल न खेळल्यास उद्याच्या लढतीत लोकेशसह अभिमन्यू ईश्वरन सलामीला येऊ शकतो. भारत अ संघाच्या बांगलादेश दौऱ्यावर अभिमन्यूने दोन कसोटींत दोन शतकं झळकावली आणि त्यामुळेच त्याची संगात निवड झाली आहे. गिल फिटनेस टेस्टमध्ये पास न झाल्यास २३ वर्षीय अभिमन्यूला संधी मिळणार आहे. सराव सत्र गिलच्या बोटाला दुखापत झाली. संघाचे फिजिओ त्याच्या बोटाला बँडेज बांधताना दिसत आहेत.
भारताचा कसोटी संघ- लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.
बांगलादेशचा कसोटी संघ ( पहिल्या सामन्यासाठी) - महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल , जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन , लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"