Join us  

IND beat SA 1st Test: कसोटी जिंकल्यानंतर जय शाह यांनी केलं टीम इंडियाचं कौतुक, पण त्यातूनही दिसला Virat Kohli Vs BCCI सामना 

IND beat SA 1st Test: BCCI secretary Jay Shah tweet goes viral : भारतीय संघानं २०२१चा शेवट गोड केला अन् आफ्रिकेत पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 9:54 AM

Open in App

IND beat SA 1st Test: BCCI secretary Jay Shah tweet goes viral : भारतीय संघानं पहिल्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेवर ११३ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह भारतीय संघानं २०२१चा शेवट गोड केला अन् आफ्रिकेत पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा दुसरा डाव १९१ धावांवर गडगडला. या विजयानंतर BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी टीम इंडियाचे कौतुक केलं, परंतु त्यांच्या या ट्विटमधून Virat Kohli Vs BCCI हा सामना अद्याप सुरू असल्याचे दिसले.

लोकेश राहुल ( १२३), मयांक अग्रवाल ( ६०), अजिंक्य रहाणे ( ४८) व विराट ( ३५) यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात ३२७ धावा उभ्या केल्या. लुंगी एनगिडीनं ६, तर कागिसो रबाडानं ३ विकेट्स घेतल्या. पावसामुळे कसोटीचा एक दिवस वाया गेला. प्रत्युत्तरात आफ्रिकेकडून टेंबा बवुमा ( ५२) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले अन् त्यांचा पहिला डाव १९७ धावांवर गुंडाळला. मोहम्मद शमीनं पाच विकेट्स घेतल्या. भारतानं दुसऱ्या डावात १७४ धावाच केल्या. रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. भारतानं ठेवलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार डीन एल्गरनं ( ७७) संघर्ष केला, परंतु तो बाद होताच आफ्रिकेचा डाव १९१ धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराह व शमी यांनी प्रत्येकी ३ , तर मोहम्मद सिराज व आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

सेंच्युरियनवरील हा भारताचाच नव्हे तर आशियाई देशातील संघाचा पहिलाच विजय ठरला. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले. पण, त्यांच्या ट्विटमध्ये कर्णधार विराट कोहलीचे नाव नसल्यानं नेटिझन्सनी त्यांना फटकारले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर शाह यांनी रोहित व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नावासह ट्विट केलं होतं. पण, सेंच्युरियनवरील ऐतिहासिक कामगिरीनंतर शाह यांच्या ट्विटमध्ये विराटचा उल्लेखही नसल्यानं अजूनही Virat Kohli Vs BCCI हा सामना सुरू असल्याचे दिसतेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत BCCIला खोटारडे पाडले होते. निवड समितीनं वन डे कर्णधारपदावरून अपमानास्पद पद्धतीनं हटवले, याचा गौप्यस्फोटही विराटनं केला. त्याचवेळी ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सांगितल्यानंतर BCCI किंवा सौरव गांगुली यांनी कोणीच मन वळवण्याचे प्रयत्न केले नव्हते, असे सांगून विराटनं थेट BCCI अध्यक्ष गांगुलीशी पंगा घेतला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीजय शाहबीसीसीआय
Open in App