Join us  

Ind - Pak Match Live : भारताचा पाकिस्तानवर दिमाखदार विजय

India - Pakistan ICC Under 19 World Cup Live Score : आयसीसी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 1:22 PM

Open in App

आयसीसी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. चार वेळचा विश्वविजेता भारतीय संघ उपांत्य लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात बाजी मारुन सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य राहील. दोन्ही संघ उपांत्य फेरीपर्यंतच्या वाटचालीमध्ये अपराजित आहेत. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला.

मॅचचे लाईव्ह अपडेट्स....

यशस्वी जैस्वालने षटकार लगावत आपले शतक पूर्ण करत भारताच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. यशस्वीने आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद १०५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली, दिव्यांश सक्सेनाने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावा करून यशस्वीला सुयोग्य साथ दिली.

 

 

भारताचा पाकिस्तानवर दिमाखदार विजय

 

दिव्यांश सक्सेनाचे अर्धशतक पूर्ण

 

यशस्वी जैस्वालचे अर्धशतक

भारताने पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना संयत सुरुवात केली. भारताने पहिल्या १० षटकांमध्ये एकही विकेट न गमावता ३३ धावा केल्या.

 

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमधील सामना चुरशीचा व्हायलाच हवा, ही दर्दी चाहत्यांची मागणी... 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मात्र पाक चाहत्यांना निराश केले. त्यांच्या भेदक माऱ्यासमोर पाक संघाची घसरगुंडी झाली. सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहैल नाझीर यांची अर्धशतकी खेळी वगळता पाकच्या अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे पाकला जेमतेम 172 धावा करता आल्या. 

पाकिस्तानचा 9वा खेळाडू माघारी परतला

पाकिस्तानसाठी एका बाजूनं खिंड लढवणाऱ्या कर्णधार रोहैल नाझीरला 42 व्या षटकात सुशांत मिश्रानं माघारी पाठवले. रोहैलनं 62 धावा केल्या

दिव्यांश सक्सेनानं पाकिस्तानच्या मोहम्मद हॅरीसचा अफलातून झेल घेत भारताला मोठ यश मिळवून दिलं. अथर्व अंकोलेकरच्या गोलंदाजीवर हॅरीसने हा फटका मारला होता.

पाहा पाकिस्तानी फलंदाजांची फजिती

28व्या षटकात पाकिस्ताननं शतकी पल्ला गाठला. पण पाकला 118 धावांवर चौथा धक्का बसला 

26व्या षटकात कर्णधार प्रियम गर्गनं चेंडू यशस्वी जैस्वालच्या हाती दिला. त्यानं हा विश्वास सार्थ ठरवताना हैदरला बाद करून पाकला मोठा धक्का दिला. हैदरनं 77 चेंडूंत 9 चौकारांसह 56 धावा केल्या.  

सलामीवीर हैदर अली आणि रोहैल नाझीर यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी संयमी खेळ करताना संघाच्या धावांचा वेग हळुहळु वाढवला. हैदर अली आणि रोहैल नाझीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 

  • सलामीवीर हैदर अली आणि रोहैल नाझीर यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी संयमी खेळ करताना संघाच्या धावांचा वेग हळुहळु वाढवला. 
  • भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 15 षटकांत 71 निर्धाव चेंडू टाकले.
  • पहिल्या दहा षटकांचे हायलाईट्स

  • 13 व्या षटकात पाकिस्ताननं अर्धशतक पूर्ण केलं.

  • रवी बिश्नोईनं पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. नवव्या षटकात त्यानं पाकिस्तानच्या फहाद मुनीरला बाद केले. विशेष म्हणजे फहादनं 16 चेंडूंचा सामना करून एकही धाव केली नाही.

 

  • भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकांत वर्चस्व गाजवताना पाकिस्तानच्या धावसंख्येवर लगाम लावला. पाकिस्तानचा हैदर अली खिंड लढवत होता, पण दुसऱ्या बाजूनं खेळपट्टीवर असलेल्या फहाद मुनीरची तारांबळ उडताना दिसली

 

  • सामन्याच्या दुसऱ्याच षटकात पाकिस्तानला धक्का बसला. त्यांचा सलामीवीर मोहम्मद हुरैरा (4) बाद झाला. शुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर सक्सेनानं त्याचा झेल टीपला

India vs Pakistan कट्टर प्रतिस्पर्धी वर्ल्ड कपमध्ये नऊ वेळा भिडले; पाहा कोणी किती वेळा मैदान मारले  

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तान