Join us  

IND vs AUS : रोहित शर्माने सामन्यात दिनेश कार्तिकचा 'जबडा' का धरला? सूर्यकुमार यादवने घडलेला सर्व प्रकार सांगितला

India vs Australia 2nd T20I : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभवाची चव चाखवली. २०८ धावा करूनही गोलंदाजांच्या अपयशामुळे भारताला हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 9:10 PM

Open in App

India vs Australia 2nd T20I : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभवाची चव चाखवली. २०८ धावा करूनही गोलंदाजांच्या अपयशामुळे भारताला हार मानावी लागली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) यष्टीरक्षक दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) याचा जबडा पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.   अनेकांना रोहितचे हे वागणे आवडले नाही, तर काहींनी तो भंकस करत असल्याचे सांगितले. रोहितच्या या कृतीवरून सोशल मीडियावर दोन गट पडले असताना आज सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) त्यादिवशी नेमके काय घडले हे सांगितले.  

रोहित शर्माने इमर्जन्सी मिटींग बोलावली, गोलंदाजांची शाळा भरवली; जसप्रीतबाबत महत्त्वाचे अपडेट्स

मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या डावातील १२व्या षटकात हा प्रसंग घडला. उमेश यादवने टाकलेला चेंडू स्टीव्ह स्मिथच्या बॅटची किनार घेत यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. मैदानावरील अम्पायरने स्मिथला नाबाद दिले आणि भारताने DRS घेतला व स्मिथची विकेट मिळवली. याच षटकात उमेशने ग्लेन मॅक्सवेलची विकेट मिळवली. पुन्हा मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्याने DRS घेतला गेला आणि पुन्हा भारताच्या बाजूने निकाल लागला. यानंतर रोहित मस्करी करताना दिसला. त्याने ॲनिमेटेड चेहरा केला आणि त्यानंतर कार्तिकचा जबडा पकडला. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्याआधी सूर्यकुमार यादवने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी त्याला मोहालीत घडलेल्या प्रकाराबद्दलही विचारले गेले. तो म्हणाला, त्या DRS बद्दल बोलायचे झाल्यास कधीकधी यष्टिंमागे उभ्या असलेल्या खेळाडूंना चेंडू व बॅट यांच्यातल्या संपर्काचा आवाज ऐकू जात नाही, पण उजव्या-डाव्या बाजूला असलेल्या खेळाडूला ऐकू जाते. रोहित व दिनेश इतकी वर्ष एकत्र खेळत आहेत आणि ते एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे त्यांच्यात एवढी मस्करी तर चालतेच.

रोहितच्या ॲनिमेटेड कृतीवरही सूर्या म्हणाला, मैदानावर असताना एवढा ताण करतो की अशा परिस्थितीत काय करावं हे कधीकधी कळत नाही. त्यात असं होतं. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मादिनेश कार्तिकसूर्यकुमार अशोक यादव
Open in App