India vs England, 2nd Test Day 2 : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करून दाखवली. पहिल्या डावात ३२९ धावा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना कोंडीत पकडले. आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी मिळून इंग्लंडला धक्के दिले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियानं केलेल्या कमबॅकचं सर्वांकडून कौतुक होत आहे. या सामन्यात प्रेक्षक स्टेडियमवर परतल्यानं टीम इंडियाच्या १२व्या खेळाडूची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९५ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. आर अश्विननं ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. सामना सुरू असताना विराट कोहली 'हातवारे' करताना दिसला, Video झाला व्हायरल
तळाचे ४ फलंदाज २९ धावांत माघारी परतल्यानं टीम इंडियाला पहिल्या डावात ३२९ धावांवर समाधान मानावे लागले. रिषभ पंत ( Rishabh Pant) ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ बाद ३०० धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरूवात केली. रिषभ पंतनं फटकेबाजी करताना कसोटी क्रिकेटमधील ८वे अर्धशतक पूर्ण केलं. मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिच यानं २ विकेट्स घेतल्या. Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!
इशांत शर्मानं पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानं रोरी बर्न्सनं पहिल्याच षटकात पायचीत केलं. त्यानंतर आर अश्विननं इंग्लंडचा दुसरा सलामीवीर डॉम सिब्ली ( १६) याची विकेट घेतली. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलनं इंग्लंडला मोठा धक्का दिला. पहिल्या कसोटीतील द्विशतकवीर जो रूटला ( Joe Root) याला बाद केले. ही भारतासाठी मोठी विकेट ठरली. त्यानंतर अश्विननं दोन विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्सचा ( १८) त्रिफळा उडवून त्यानं विक्रमाला गवसणी घातली.
इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकले नाही. यष्टिरक्षक रिषभ पंतनंही दोन अफलातून झेल घेत इंग्लंडला बॅकफूटवर पाठवले. इंग्लंडचा बेन फोक्स ४२ धावांवर नाबाद राहिला.