India vs England Test : भारत-इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला दिवस-रात्र कसोटी ( Day Night Test) सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागला. तिसऱ्या कसोटीतील ३० विकेट्सपैकी २८ विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या आणि खेळपट्टीवरून वाद सुरू झाला. अशात भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( Former Cricketer Mohammad Azharuddin) यानं टर्निंग खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी, यासाठी अजब गजब सल्ला दिला. ५८ वर्षीय अझरुद्दीननं अशा खेळपट्टीवर स्पाइक बुटांऐवजी रबरचे सोल असलेले बुट घालणे योग्य ठरेल, असा सल्ला दिला. इंग्लंडला मोठा धक्का; कसोटी मालिका मध्येच सोडून खेळाडू परतला माघारी
अझरुद्दीननं ट्विट केलं की,''फलंदाजी करताना स्पाइक बुट घालण्यात काहीच अर्थ नाही. रबरचे सोल असलेल्या बुटांमुळे फलंदाजांचे कौशल्य कमी होत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खडतर खेळपट्टींवर मी काही अविश्वसनीय खेळी पाहिल्या आहेत, ज्या खेळाडूंनी रबरचे सोल असलेले बुट घालून खेळल्या आहेत. अशात धाव घेताना खेळाडू घसरून पडू शकतो, असा तर्क लावला जात आहे, परंतु विम्बल्डनमध्ये खेळाडू रबरचे सोल असलेली बुट घालूनच खेळतात.'' ख्रिस गेलची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार; कारण समजल्यावर 'युनिव्हर्स बॉस'चा वाटेल अभिमान