India vs England, 2nd Test : सामना सुरू असताना विराट कोहली 'हातवारे' करताना दिसला, Video झाला व्हायरल

India vs England, 2nd Test Day 2 : या सामन्यात प्रेक्षक स्टेडियमवर परतल्यानं टीम इंडियाच्या १२व्या खेळाडूची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यात कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्यांचा उत्साह वाढवताना दिसला. ( Virat Kohli goes "Whistle Podu" ) 

By स्वदेश घाणेकर | Published: February 14, 2021 02:21 PM2021-02-14T14:21:00+5:302021-02-14T14:22:02+5:30

whatsapp join usJoin us
IND v ENG 2021: Virat Kohli goes "Whistle Podu" to get the Chennai crowd to make some noise, Video | India vs England, 2nd Test : सामना सुरू असताना विराट कोहली 'हातवारे' करताना दिसला, Video झाला व्हायरल

India vs England, 2nd Test : सामना सुरू असताना विराट कोहली 'हातवारे' करताना दिसला, Video झाला व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd Test Day 2 : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करून दाखवली. पहिल्या डावात ३२९ धावा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना कोंडीत पकडले. आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी मिळून इंग्लंडच्या ६ फलंदाजांना बाद केले. इंग्लंडचे १०६ धावांत ८ फलंदाज माघारी परतले होते. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियानं केलेल्या कमबॅकचं सर्वांकडून कौतुक होत आहे. या सामन्यात प्रेक्षक स्टेडियमवर परतल्यानं टीम इंडियाच्या १२व्या खेळाडूची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यात कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्यांचा उत्साह वाढवताना दिसला. टीम इंडियाला आणखी जोरात चिअर करा यासाठी विराट प्रेक्षकांकडे पाहून हातवारे करत होता आणि शिट्या वाजवताना दिसला. ( Virat Kohli goes "Whistle Podu" )  Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!



तळाचे ४ फलंदाज २९ धावांत माघारी परतल्यानं टीम इंडियाला पहिल्या डावात ३२९ धावांवर समाधान मानावे लागले. रिषभ पंत ( Rishabh Pant) ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ बाद ३०० धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरूवात केली. रिषभ पंतनं फटकेबाजी करताना कसोटी क्रिकेटमधील ८वे अर्धशतक पूर्ण केलं. मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिच यानं २ विकेट्स घेतल्या. टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर!

इशांत शर्मानं पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानं रोरी बर्न्सनं पहिल्याच षटकात पायचीत केलं. त्यानंतर आर अश्विननं इंग्लंडचा दुसरा सलामीवीर डॉम सिब्ली ( १६) याची विकेट घेतली. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलनं इंग्लंडला मोठा धक्का दिला. पहिल्या कसोटीतील द्विशतकवीर जो रूटला ( Joe Root) याला बाद केले. ही भारतासाठी मोठी विकेट ठरली. त्यानंतर अश्विननं दोन विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्सचा ( १८) त्रिफळा उडवून त्यानं विक्रमाला गवसणी घातली. बेन स्टोक्सला सर्वाधिक ९वेळ बाद करण्याचा विक्रम अश्विननं नावावर केला .  इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, आर अश्विननं मोडला कपिल देव, हरभजन सिंग यांचा विक्रम

Web Title: IND v ENG 2021: Virat Kohli goes "Whistle Podu" to get the Chennai crowd to make some noise, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.