Join us  

IND v NZ, 3rd ODI : रोहित शर्माविना भारतीय संघ ठरला सलग सातव्यांदा फेल, ही घ्या आकडेवारी...

या पराभवानंतर अजून एक गोष्ट समोर आली आहे आणि ती गोष्ट म्हणजे रोहित शर्मा संघात नसताना भारताचा हा सलग सातवा पराभव आहे. पण ही आकडेवारी नेमकी आहे तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 5:12 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. त्याचबरोबर भारताला तब्बल ३१ वर्षांनी असा मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. या पराभवानंतर अजून एक गोष्ट समोर आली आहे आणि ती गोष्ट म्हणजे रोहित शर्मा संघात नसताना भारताचा हा सलग सातवा पराभव आहे. पण ही आकडेवारी नेमकी आहे तरी काय...

भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत न्यूझीलंडवर निर्भेळ यश मिळवले. या ट्वेंटी-20 मालिकेतील यशानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावलेले होते. पण, त्यांच्या या आनंदात दुखापतीचा खडा पडला. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मानं वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली. रोहित शर्मानं चार ट्वेंटी-20 सामन्यांत दोन अर्धशतकं झळकावली. पण, पाचव्या सामन्यात रोहितला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं.

रोहिती ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. पण त्यामुळेच रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली. पण या गोष्टीचा फटका भारताला बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहित खेळत असताना भारताने ट्वेन्टी-२० मालिका जिंकली होती. पण आता रोहित खेळत नसल्यामुळे भारताला वनडे मालिका ३-० अशी गमवावी लागली आहे.

रोहित ज्या गेल्या सात सामन्यांमध्ये खेळला नाही, त्य सातही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित खेळला नाही आणि भारताला या तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. यापूर्वी रोहित इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये खेळला नव्हता, या तिन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात रोहित खेळला नव्हता आणि हा सामना भारताला जिंकता आला नव्हता.

हा रोहितच्या कसोटी कारकिर्दीला धक्काबीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की,''पोटरीच्या दुखापतीमुळे रोहित शर्मानं न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.'' त्यामुळे रोहितच्या कसोटी कारकिर्दीला पुन्हा एक धक्का बसला आहे. गतवर्षी रोहितनं कसोटी मालिकेत दमदार खेळ केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्यानं दोन शतकं आणि एक द्विशतक झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे रोहितही न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्यासाठी उत्सुक होता. 

कसोटी कारकिर्दीत प्रथमच सलामीला आला अन्...रोहित शर्मा गतवर्षी प्रथम कसोटी कारकिर्दीत सलामीला खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित सलामीला आला. पहिल्याच सामन्यात त्यानं 176 धावांची वादळी खेळी केली. त्याचा हा झंझावात दुसऱ्या डावातही पाहायला मिळाला. रोहितनं दुसऱ्या डावात 127 धावा चोपल्या. त्यानंतर रांची कसोटीत त्यानं 212 धावांची खेळी केली. कसोटीत सलामीला येताना त्यानं 5 सामन्यांत 92.66 च्या सरासरीनं 556 धावा चोपल्या. रोहितनं एकूण कसोटी कारकिर्दीत 32 सामन्यांत 46.54 च्या सरासरीनं 2141 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतकं आणि 10 अर्धशतकं झळकावली आहेत.  

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड