इंदूर: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारताने विजयी सलामी दिली आहे. आजच्या सामन्यातून विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर शुबमन गिल आणि तिलक वर्मा यांना वगळण्यात आले आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, मुझीर उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.
दरम्यान, भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल पहिल्या सामन्याला मुकला होता. त्यांचे आजच्या सामन्यातून पुनरागमन झाले असून शुबमन गिल आणि तिलक वर्मा यांना वगळण्यात आले आहे. गिलचा खराब फॉर्म पाहता त्याला डच्चू दिल्याचे कळते. तर विराटच्या जागी पहिल्या सामन्यात संधी मिळालेल्या तिलकला किंग कोहली येताच बाकावर बसावे लागले.