IND vs AFG Live: भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान

ind vs afg 2nd t20 live match: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 08:38 PM2024-01-14T20:38:50+5:302024-01-14T20:39:19+5:30

whatsapp join usJoin us
ind vs afg 2nd t20 live match gulbadin naib scored 57 runs, arshdeep singh took 3 wickets, afghanistan set team india a target of 173 runs to win | IND vs AFG Live: भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान

IND vs AFG Live: भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AFG 2nd T20 Match Live Updates In Marathi | इंदूर: पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घ्यायच्या इराद्याने आज अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने साजेशी कामगिरी केली. लहान मैदानाचा फायदा घेत अफगाणिस्तानच्या नवख्या फलंदाजांनी देखील भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक ५७ धावा केल्या. घातक वाटणाऱ्या गुलबदीनला बाहेर पाठवण्यात अक्षर पटेलला यश आले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सोपा झेल घेऊन पाहुण्या संघाला मोठा धक्का दिला.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना इंदूर येथे खेळवला जात आहे. पहिला सामना जिंकून विजयी सलामी देणाऱ्या भारतीय संघाकडे आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तर, आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान पाहुण्या अफगाणिस्तानसमोर आहे. पहिल्या सामन्यात शिवम दुबेच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सहज विजय मिळवला होता. 

भारताला १७३ धावांचे आव्हान 
तत्पुर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची खराब सुरूवात झाली. पण, गुलबदिन नायबने महत्त्वपूर्ण खेळी करून यजमानांना कडवे आव्हान दिले. लहान मैदान अन् अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांची खराब गोलंदाजी झाली. अफगाणिस्तानने एकोणिसाव्या षटकात १९ धावा कुटल्या. अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १७२ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी आणि मालिका खिशात घालण्यासाठी १७३ धावांची आवश्यकता आहे.  अफगाणिस्तानने आतापर्यंतची भारताविरूद्धची ही सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. तर अष्टपैलू शिवम दुबेने एक बळी पटकावला.  
 
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार. 
 
आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -
इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, मुझीर उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.

Web Title: ind vs afg 2nd t20 live match gulbadin naib scored 57 runs, arshdeep singh took 3 wickets, afghanistan set team india a target of 173 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.