IND vs AFG: मालिका जिंकण्यात भारत 'यशस्वी'! जैस्वाल-दुबेचा रूद्रावतार; २६ चेंडू राखून विजय

ind vs afg 2nd t20 live match: भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 10:04 PM2024-01-14T22:04:41+5:302024-01-14T22:05:02+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AFG 2nd T20 Match Live Updates Yashasvi Jaiswal scored 68 and Shivam Dube scored an unbeaten 63 as Team India won by 6 wickets and lead the series 2-0   | IND vs AFG: मालिका जिंकण्यात भारत 'यशस्वी'! जैस्वाल-दुबेचा रूद्रावतार; २६ चेंडू राखून विजय

IND vs AFG: मालिका जिंकण्यात भारत 'यशस्वी'! जैस्वाल-दुबेचा रूद्रावतार; २६ चेंडू राखून विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AFG 2nd T20 Match Live Updates In Marathi | इंदूर: तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने दुसरा सामना सहज जिंकला. जैस्वाल आणि दुबे यांनी तिसऱ्या बळीसाठी ९६ धावांची भागीदारी नोंदवली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर युवा शिलेदारांनी मोर्चा सांभाळला. शिवम दुबेने मोहम्मद नबीच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिला. भारताने २६ चेंडू आणि ६ गडी राखून विजय मिळवला अन् मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. 

अफगाणिस्तानने दिलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर तंबूत परतला. विराट कोहलीला साजेशी खेळी करण्यात यश आले पण त्याला २९ धावांवर असताना नवीन-उल-हकने बाद करून भारताला दुसरा झटका दिला. रोहित-विराट बाद झाल्यानंतर जैस्वाल आणि दुबे यांनी स्फोटक खेळी केली. शिवम दुबेने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. 

भारताची विजयी आघाडी 
दरम्यान, लहान मैदानाचा फायदा घेत अफगाणिस्तानच्या नवख्या फलंदाजांनी देखील भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली होती. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक ५७ धावा केल्या. घातक वाटणाऱ्या गुलबदीनला बाहेर पाठवण्यात अक्षर पटेलला यश आले. अखेर अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १७२ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी आणि मालिका खिशात घालण्यासाठी १७३ धावांची आवश्यकता होती. भारताने या विजयासह मालिकेवर कब्जा केला आणि अफगाणिस्तानने पराभवाचा इतिहास कायम ठेवला.

सलामीवीर यशस्वी जैस्वालने ६ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ६८ धावा कुटल्या. शिवम दुबेने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३२ चेंडूत ६३ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. भारतीय संघाने अखेर १५.४ षटकांत ४ बाद १७३ धावा करून विजय साकारला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार. 
 
आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -
इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, मुझीर उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.

Web Title: IND vs AFG 2nd T20 Match Live Updates Yashasvi Jaiswal scored 68 and Shivam Dube scored an unbeaten 63 as Team India won by 6 wickets and lead the series 2-0  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.