विराट कोहलीचे 'Super' क्षेत्ररक्षण; ज्यामुळे टीम इंडियाचा टळला पराभव, Video Viral 

IND vs AFG 3rd T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहलीला गोल्डन डकवर माघारी जावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:17 PM2024-01-18T12:17:04+5:302024-01-18T12:17:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AFG 3rd T20I : Virat Kohli produces incredible fielding efforts to thrill Bengaluru crowd & Rahul Dravid Video | विराट कोहलीचे 'Super' क्षेत्ररक्षण; ज्यामुळे टीम इंडियाचा टळला पराभव, Video Viral 

विराट कोहलीचे 'Super' क्षेत्ररक्षण; ज्यामुळे टीम इंडियाचा टळला पराभव, Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AFG 3rd T20I ( Marathi News ) : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहलीला गोल्डन डकवर माघारी जावे लागले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेट कारकीर्दित विराट प्रथमच पहिल्याच चेंडूवर बाद झाला. फलंदाजीत जरी विराटने निराश केले असले तरी त्याने क्षेत्ररक्षणात महत्त्वाचा वाटा उचलून भारताच्या यशात हारभार लावला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानचा षटकार विराटने सुपरमॅनसारखी झेप घेत अडवला आणि यामुळे भारताचा पराभव टळला. विराटचे हे क्षेत्ररक्षण पाहून अफगाणिस्तानच्या डग आऊटमधील खेळाडू थक्क झाले, तर भारताच्या डग आऊटमध्ये आनंदाचे वातावरण दिसले. बंगळुरूच्या प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे कौतुक केले.

रोहित शर्माने चिटींग केली? दुसऱ्या Super Over मध्ये फलंदाजीला आल्याने गोंधळ; वाचा नियम 


रोहित शर्मा ( नाबाद १२१) आणि रिंक सिंगू ( नाबाद ६९) यांच्या १९० धावांच्या विक्रमी भागीदारीने भारताला ४ बाद २१२ धावांचा डोंगर उभा करून दिला. अफगाणिस्ताननेही चांगली टक्कर दिली. इब्राहिम जादरान व रहमनुल्लाह गुरबाज यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना ९३ धावांची सलामी दिली. मोहम्मद नबीने त्यानंतर फटकेबाजी केली. वॉशिंग्टन सुंदरने सामन्यातील तिसरी विकेट घेताना नबीला माघारी पाठवले. त्यानंतर करिम जनत मैदानावर आला. त्याने सुंदरने टाकलेला चेंडू षटकाराच्या दिशेने टोलावला आणि त्यात तो यशस्वी होतोय असेच वाटत होते. 


पण, कोहलीने हवेत उंच झेप घेतली आणि संघासाठी पाच धावा वाचवल्या.  


त्यानंतर कोहलीने आणखी एक अफलातून झेल घेतला. आवेश खानच्या गोलंदाजीवर नजिबुल्लाह जादरानने मारलेला चेंडू कोहलीने टिपला.   

Web Title: IND vs AFG 3rd T20I : Virat Kohli produces incredible fielding efforts to thrill Bengaluru crowd & Rahul Dravid Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.