भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. जून महिन्यामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाठी ही शेवटची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका ठरणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इब्राहिम झादरानकडे अफगाणिस्तानचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या अफगाणिस्तानच्या संघामध्ये दिग्गज गोलंदाज राशिद खान, अष्टपैलू मोहम्मद नबी, रहमतुल्ला गुरबाझ, हशमतुल्लाह झाझाई यांचा समावेश आहे. या संघात राशिद खानला स्थान देण्यात आले असले तरी, तो मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, भारत आणि अफगणिस्तानमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा ११ जावेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाईल. तर दुसरा टी-२० सामना हा १४ जानेवारी रोजी इंदूर येथे होणार आहे. तर बंगळुरू येथे १७ जानेवारी रोजी तिसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे.
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला अफगाणिस्तानचा संघ
इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान.
Web Title: Ind Vs Afg: Afghanistan team announced for T20 series against India, this dashing player will lead it
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.