भारत आणि अफगानिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूर मधील होळकर मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 26 चेंडू आणि 6 विकेटने विजय मिळवला आणि मालिका आपल्या नावे केली. भारतासाठी यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रोहितनं केली धोनीची बरोबरी -या सामन्यात रोहित शर्माने विजयाबरोबरच एमएस धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत एमएस धोनीची बरोबरी केली आहे. रोहितने टी-20 मध्ये 41 सामने जिंकले आहेत. आतापर्यंत रोहित शर्माने कर्णधार म्हणून 53 सामने खेळले असून 41 सामने जिंकले आहेत. तसेच 12 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
धोनीचा विक्रम -यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने कर्णधार म्हणून एकूण 72 टी-20 सामने खेळले आहेत. यांपैकी 41 सामने जिंकले आहेत. तसेच 28 सामन्यांत त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट आहे. त्याने 50 सामने खेळले आहेत. यांपैकी त्याला 30 सामन्यांत जय तर 16 सामन्यात पराजयाचे तोंज बघावे लागले आहेत.
सर्वाधिक टी-20 सामने खेळलेला खेळाडू -याशिवाय रोहित शर्मा, हा कर्णधार म्हणून सर्वाधिक 12 टी-20 मालिका जिंकणारा कर्णधार ठरला आहे. याच बरोबर रोहित शर्मा वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150 सामने खेळणारा पहिला खेळाडूही बनला आहे.