Emerging Asia Cup : अफगाणिस्तान फायनलमध्ये! भारताचा विजयरथ रोखला; तिलक वर्माच्या संघाने गुडघे टेकले

ind vs afg emerging asia cup : अफगाणिस्तानने इमर्जिंग आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत भारताला नमविले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:19 PM2024-10-26T14:19:05+5:302024-10-26T14:22:02+5:30

whatsapp join usJoin us
ind vs afg emerging asia cup Afghanistan entered the final by defeating Team India   | Emerging Asia Cup : अफगाणिस्तान फायनलमध्ये! भारताचा विजयरथ रोखला; तिलक वर्माच्या संघाने गुडघे टेकले

Emerging Asia Cup : अफगाणिस्तान फायनलमध्ये! भारताचा विजयरथ रोखला; तिलक वर्माच्या संघाने गुडघे टेकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अल अमेरात : अफगाणिस्तान अ संघाने आपला आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि धक्कादायक विजय मिळविताना शुक्रवारी बलाढ्य भारत अ संघाला २० धावांनी नमवीत उदयोन्मुख पुरुष आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. अन्य उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला सात गड्यांनी नमविले. 

अफगाणिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २०६ धावा उभारल्यानंतर भारतीयांना २० षटकांत ७ बाद १८६ धावांवर रोखले. रमनदीप सिंगने ३४ चेंडूंत ८ चौकार व २ षट्‌कारांसह ६४ धावांची झुंज दिली. आयुष बदोनी (२४ चेंडूंत ३१), नेहाल वधेरा (१४ चेंडूंत २०) यांनीही शर्थीचे प्रयत्न केले. एएम घझानफर (२/१४) याने नियंत्रित मारा केला. त्याआधी, झुबैद अकबरी आणि सेदिकुल्लाह अटल यांच्या ८७ चेंडूंतील १३७ धावांच्या जबरदस्त सलामीच्या जोरावर अफगाणने द्विशतकी मजल मारली. झुबैदने ४१ चेंडूंत ५ चौकार व ४ षट्‌कारांसह ६४, तर अटलने ५२ चेंडूंत ७ चौकार व ४ षट्‌कारांसह ८३ धावा कुटल्या. करिम जनतनेही २० चेंडूंत ४ चौकार व २ षट्‌कारांसह ४१ धावा चोपल्या. भारताकडून रसिख सलामने २५ धावांत ३ बळी घेतले.

Web Title: ind vs afg emerging asia cup Afghanistan entered the final by defeating Team India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.