IND vs AFG: विराट कोहलीचा महाविक्रम, इंदूर टी-20 मध्ये 29 धावा करताच रचला इतिहास!

या सामन्यात विराट कोहलीने 16 चेंडूत 181.25 च्या स्ट्राईक रेटने 29 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:30 AM2024-01-15T10:30:10+5:302024-01-15T10:33:58+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AFG Indore T20 virat kohli first cricketer to complete 2000 plus runs while chasing in all three formats makes history | IND vs AFG: विराट कोहलीचा महाविक्रम, इंदूर टी-20 मध्ये 29 धावा करताच रचला इतिहास!

IND vs AFG: विराट कोहलीचा महाविक्रम, इंदूर टी-20 मध्ये 29 धावा करताच रचला इतिहास!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये परतत ऐतिहास रचला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने 29 धावा करत इतिहास रचला. या सामन्यात विराट कोहलीने 16 चेंडूत 181.25 च्या स्ट्राईक रेटने 29 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता.

विराटची ऐतिहासिक कामगिरी -
या सामन्यात 29 धावा करताच विराट कोहलीने या फॉरमॅटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 2012 धावा केल्या आहेत. याच बरोबर, क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय) लक्ष्याचा पाठलाग करताना 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट कोहली हा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे. तसेच, T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 2000 धावा करणारा विराट हा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. पॉल स्टर्लिंगने T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पाठलाग करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. पॉल स्टर्लिंगने T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 2074 धावा केल्या आहेत.

टी-20 इंटरनॅशनलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -
1. पॉल स्टर्लिंग (आयरलँड) - 2074
2. विराट कोहली (भारत) - 2000
3. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 1788
4. बाबर आजम (पाकिस्तान) - 1628
5. रोहित शर्मा (भारत) - 1465

भारताने मालिका जिंकली -
तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने दुसरा सामना सहज जिंकला. जैस्वाल आणि दुबे यांनी तिसऱ्या बळीसाठी 96 धावांची भागीदारी नोंदवली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर युवा शिलेदारांनी मोर्चा सांभाळला. शिवम दुबेने मोहम्मद नबीच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिला. भारताने 26 चेंडू आणि 6 गडी राखून विजय मिळवला अन् मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Web Title: IND vs AFG Indore T20 virat kohli first cricketer to complete 2000 plus runs while chasing in all three formats makes history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.