India vs Afghanistan 1st T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे १४ महिन्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करणार होते. पण, उद्या सामना अन् आज विराट कोहलीने पहिल्या सामन्यातून माघार घेतल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने जाहीर केले. त्यामुळे उद्याच्या सामन्यात रोहित व यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला येईल असेही द्रविड म्हणाला.
रोहित व विराट हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ नंतर आतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मॅच खेळलेले नाहीत. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्यांचे पुनरागमन होणार होते. रोहित शर्माकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व १४ महिन्यानंतर पुन्हा आले आहे. हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव यांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे. ऋतुराज गायकवाडही याच कारणामुळे ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. पण, आज झालेल्या पत्रकार परिषदेत द्रविडने सांगितले की, वैयक्तिक कारणास्तव विराट पहिल्या सामन्यात खेळणार नाही. पण, तो दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात खेळणार आहे. रोहित व यशस्वी हे दोघं सलामीला येतील.
विराट कोहलीची कन्या वामिका हिचा दुसरा वाढदिवस ११ जानेवारीला आहे आणि कदाचीत त्यामुळेच त्याने पहिल्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला असावा.
भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान - इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान.
IND vs AFG TimeTable११ जानेवारी - मोहाली, सायंकाळी ७ वाजल्यापासून१४ जानेवारी - इंदौर, सायंकाळी ७ वाजल्यापासून१७ जानेवारी - बंगळुरू, सायंकाळी ७ वाजल्यापासून