India vs Afghanistan T20I Series : भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. मोहाली येथे पहिला सामना खेळवला जाणार आहे. यामालिकेतून रोहित शर्मा व विराट कोहली हे भारताचे दोन सीनियर खेळाडू १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० संघातून पुनरागमन करणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताची ही शेवटची ट्वेंटी-२० मालिका आहे आणि त्यामुळे रोहित व विराट यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तेच अफगाणिस्तानचा संघही टीम इंडियाला चांगली टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधीच संघातील प्रमुख खेळाडूने माघार घेतली आहे.
अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू राशीद खान याने या मालिकेतून माघार घेतली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राशीद आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पाठीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया पार पडणार आहे. बिग बॅश लीगमधील एडिलेड स्ट्रायकर्स संघाकडून राशीद खेळतो, परंतु दुखापतीमुळे त्याने या लीगमधूनही माघार घेतली आहे. त्याचे पुनरागमन कधी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झाद्रान याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राशीदच्या गैरहजेरीत मोहम्मद नबी, क्वैस अहमद व नूर अहमद यांच्यावर फिरकीची मदार असेल.
भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान - इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान.
IND vs AFG TimeTable११ जानेवारी - मोहाली, सायंकाळी ७ वाजल्यापासून१४ जानेवारी - इंदौर, सायंकाळी ७ वाजल्यापासून१७ जानेवारी - बंगळुरू, सायंकाळी ७ वाजल्यापासून