Join us  

BCCI ला रोहित शर्मा व विराट कोहली ट्वेंटी-२०त एकत्रित नकोत; मोठा अधिकारी घेणार फैसला

IND vs AFG T20 Series : भारतीय संघाने आता पूर्ण फोकस ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे वळवला आहे. १ ते १९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 1:33 PM

Open in App

IND vs AFG T20 Series  (Marathi News) : भारतीय संघाने आता पूर्ण फोकस ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे वळवला आहे. १ ते १९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणार आहे. पण, या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे आणि त्यात नेतृत्व नेमकं कोण करेल हा प्रश्न आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवडीवर गंभीर चर्चा सुरू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार BCCI रोहितला ट्वेंटी-२० संघात खेळवायचे आहे, परंतु विराटबाबत ते तितके सकारात्मक नाहीत. 

रोहित व विराट हे दोघंही २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०सामना खेळलेले नाहीत.  पण भारतीय फलंदाजीचा पाया मानल्या जाणाऱ्या या दोन्ही फलंदाजांना आयसीसी स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी मिळायला हवी, असे अनेकांना वाटते. या दोघांनीही निवड समितीला ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे. अजित आगरकर दुसऱ्या कसोटीदरम्यान रोहित आणि विराटच्या भेटीसाठी दक्षिण आफ्रिकेत गेला होता. आगरकर व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे रोहित व विराटला खेळवण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु बीसीसीआयचं तसं म्हणणं नाही. अशा परिस्थितीत आता बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीच अंतिम निर्णय घेतील. 

अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या T20 ला फक्त 4 दिवस बाकी आहेत आणि BCCI ने अजून तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही. माजी राष्ट्रीय निवडकर्ता म्हणाला की, जर तुमच्याकडे रोहित, गिल, विराट आणि सूर्या असेल तर डावखुरा कोणी नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही कोहलीला वगळले तर तुम्ही गिल नंबर 3 आणि जैस्वाल रोहितसह सलामी करू शकता. पण आगरकर असा निर्णय घेऊ शकतील का? रोहित आणि कोहली दोघेही एकत्र खेळले तर ऋतुराज गायकवाड किंवा इशान किशन या दोघांना टॉप ऑर्डरमध्ये संधी मिळेल. अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत आधी दोघांना संधी द्यावी आणि त्यानंतर आयपीएलमधील या खेळाडूंची कामगिरी पाहावी, या आधारावरही अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला अफगाणिस्तानचा संघइब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान. 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीअफगाणिस्तानबीसीसीआयभारत