IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे आणि उद्यापासून भारताविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या (IND vs AUS ODI Series) अडचणी वाढल्या आहेत. कारण संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाल्यानंतर पूर्णपणे बरा झालेला नाही. जर त्याला नेट प्रॅक्टिस दरम्यान बॅटिंग करण्यास सोयीस्कर वाटत असेल तरच त्याला पहिल्या वनडेसाठी प्लेइंग-११ चा भाग बनवता येईल, असे सांगण्यात येत आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ च्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ३६ वर्षीय वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो परत ऑस्ट्रेलियाला गेला. मॅट रेनशॉला प्लेइंग-११ मध्ये वॉर्नरचा कंसशन पर्याय म्हणून घेण्यात आले. यानंतर उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी वॉर्नरलाही ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले. मात्र, आता भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक , शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
नोट- रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही, त्याच्या जागी हार्दिक पांड्या टीम इंडियाची कमान सांभाळेल.
ऑस्ट्रेलिया संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, ऱ्हाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"