IND vs AUS 1st ODI | मोहाली : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण या मालिकेनंतर काही दिवसांतच ५ ऑक्टोबरपासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल यजमान भारताच्या बाजूने लागला अन् भारताने पाहुण्या कांगारूंना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन -
लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
भारत आणि ऑस्ट्रेलिया वन डे मालिका
- पहिला सामना - २२ सप्टेंबर - मोहाली
- दुसरा सामना - २४ सप्टेंबर - इंदौर
- तिसरा सामना - २७ सप्टेंबर - राजकोट
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघ -
लोकेश राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
Web Title: IND vs AUS 1st ODI Indian captain KL Rahul has won the toss and elected to bowl first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.