Join us  

IND vs AUS : भारताने टॉस जिंकला! ऋतुराजची एन्ट्री; सिराजला विश्रांती तर शमीला संधी, पाहा प्लेइंग XI

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 1:26 PM

Open in App

IND vs AUS 1st ODI | मोहाली : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण या मालिकेनंतर काही दिवसांतच ५ ऑक्टोबरपासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल यजमान भारताच्या बाजूने लागला अन् भारताने पाहुण्या कांगारूंना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 आजच्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन - 

लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया वन डे मालिका 

  1. पहिला सामना - २२ सप्टेंबर - मोहाली
  2. दुसरा सामना - २४ सप्टेंबर - इंदौर
  3. तिसरा सामना - २७ सप्टेंबर - राजकोट

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. 

अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघऋतुराज गायकवाडमोहम्मद सिराज