India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे आघाडीचे तिन्ही फलंदाज माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाने भारताला धक्का दिला. हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला. राहुल एका बाजूने विकेट टिकवून होता आणि त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली आहे. दरम्यान, या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या अम्पायरसोबत भांडताना दिसला...
मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. मजबूत स्थितीत वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज शमीने ११ चेंडूत माघारी पाठवून भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श ही जोडी तुटल्यानंतर कांगारूंचा डाव गडगडला. स्टीव्ह स्मिथ ( २२) व मिचेल मार्श यांची ७२ धावांची भागीदारी १२व्या षटकात हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. मार्श ६५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. मोहम्मद शमीने जॉश इंग्लिस ( २६) , कॅमेरून ग्रीन ( १२) आणि मार्कस स्टॉयनिस ( ५) या विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर गुंडाळला. शमीने ६-२-१७-३ अशी, सिराजने ५.४-१-२९-३ अशी गोलंदाजी केली. रवींद्र जडेजाने दोन, तर कुलदीप व हार्दिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात हार्दिक अम्पायरसोबत भांडताना दिसतोय... मिचेल मार्श फलंदाजी करत असताना हार्दिक गोलंदाजीवर होता. तो रन अप घेऊन नॉन स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचला, तितक्यात मार्शने त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखले. साईड स्क्रीनसमोर कुणीतरी आल्याने मार्शने असे केले. त्यावरून हार्दिक भडकला अन् अम्पायरसोबत भांडताना दिसला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : Hardik Pandya has heated altercation with umpire after Mitchell Marsh forces him to stop mid run-up, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.