IND vs AUS, 1st ODI Live : एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video 

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 05:51 PM2023-03-17T17:51:36+5:302023-03-17T17:52:07+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : India are 16-3 after 5 overs, with Mitchell Starc putting an exhibition of pace bowling, Kishan, Virat Kohli and Surya dismissed, video | IND vs AUS, 1st ODI Live : एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video 

IND vs AUS, 1st ODI Live : एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे आघाडीचे तिन्ही फलंदाज माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाने भारताला धक्का दिला. मिचेल स्टार्कची हॅटट्रिक हुकली असली तरी त्याने दिलेले धक्के भारताला महागात पडू शकतात. 

OMG! ५०० रुपये किलो भात, १००० रुपये किलो पिठ; विराट कोहलीचा नादच खुळा

मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. मजबूत स्थितीत वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज शमीने ११ चेंडूत माघारी पाठवून भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. कर्णधार हार्दिक पांड्याने योग्य वेळी योग्य बदल केले आणि गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवताना ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श ही जोडी तुटल्यानंतर कांगारूंचा डाव गडगडला.  स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श यांची ७२ धावांची भागीदारी १२व्या षटकात हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. 

मार्शचे फटके पाहून चाहते चिंतेत गेले होते आणि ही चिंता रवींद्र जडेजाने दूर केली. मार्श ६५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर सिराजकरवी झेलबाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. मोहम्मद शमीने  इंग्लिस ( २६) , कॅमेरून ग्रीन ( १२) आणि मार्कस स्टॉयनिस ( ५) या विकेट घेतल्या. सिराजने आणखी एक धक्का देताना ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर गुंडाळला. भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी २००७मध्ये वानखेडेवरच १९३ धावांवर कांगारू ऑलआऊट झाले होते. शमीने ६-२-१७-३ अशी, सिराजने ५.४-१-२९-३ अशी गोलंदाजी केली. रवींद्र जडेजाने दोन, तर कुलदीप व हार्दिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतालाही दुसऱ्या षटकात धक्का बसला. इशान किशन ( ३) मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर LBW झाला. मिचेल स्टार्कच्या तिसऱ्या षटकात शुबमन गिलचा झेल यष्टिरक्षक जॉश इंग्लिसने टाकला. पण, त्याची भरपाई विराट कोहलीची ( ४) विकेट घेऊन स्टार्कने केली. भारताला १६ धावांवर दुसरा धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने आणखी एक विकेट घेताना सूर्यकुमार यादवला भोपळ्यावर बाद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : India are 16-3 after 5 overs, with Mitchell Starc putting an exhibition of pace bowling, Kishan, Virat Kohli and Surya dismissed, video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.