India vs Australia 1st ODI Live : बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर पहिला वन डे सामना आज खेळवला जात आहे. श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतलेली आहे. रोहित शर्मा मेहुण्याचं लग्न असल्याने पहिल्या वन डे सामन्यात खेळणार नाही आणि हार्दिक पांड्या वानखेडेवर नेतृत्व करणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत इशान किशन आणि शुबमन गिल ही जोडी पहिल्या वन डेत सलामीला खेळताना दिसेल, असे हार्दिकने सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले होते. इशान किशन आणि शुबमन गिल या दोघांनी नुकतंच वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे आणि या दोन द्विशतकवीरांना एकत्र खेळताना पाहण्याची संधी उद्या वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. श्रेयस नसल्याने सूर्यकुमार यादवला वन डे संघात संधी मिळेल आणि लोकेश राहुल मधल्या फळीत खेळणार आहे.
भारतीय संघ ४ जलदगती गोलंदाज ( हार्दिक, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी), दोन फिरकीपटू ( रवींद्र जडेजा व कुलदीप यादव) यांच्यासह ५ फलंदाजांची फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. लोकेश राहुल यष्टिंमागे दिसणार आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन - शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
ऑस्ट्रेलियाचा संघ - ट्रॅव्हीस हेड, मिचेल मार्शन, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"