IND vs AUS, 1st ODI Live : मोहम्मद शमीने ११ चेंडूंत ३ फलंदाजांना दाखवला घरचा रस्ता; कांगारूंची वाईट अवस्था, Video 

India vs Australia 1st ODI Live : मोहम्मद सिराजने भारताला अपेक्षित सुरुवात करून दिली, परंतु स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श या जोडीने डोकेदुखी वाढवली होती, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 04:18 PM2023-03-17T16:18:58+5:302023-03-17T16:19:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : Mohammed Shami knocks Cameron Green's off-stump with an absolute peach of a delivery, Shami in this spell: 3-2-8-3, he take 3 wickets in 11 balls, Video  | IND vs AUS, 1st ODI Live : मोहम्मद शमीने ११ चेंडूंत ३ फलंदाजांना दाखवला घरचा रस्ता; कांगारूंची वाईट अवस्था, Video 

IND vs AUS, 1st ODI Live : मोहम्मद शमीने ११ चेंडूंत ३ फलंदाजांना दाखवला घरचा रस्ता; कांगारूंची वाईट अवस्था, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st ODI Live : मोहम्मद सिराजने भारताला अपेक्षित सुरुवात करून दिली, परंतु स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श या जोडीने डोकेदुखी वाढवली. कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी मधल्या षटकांत ऑस्ट्रेलियाला धक्के देताना कमबॅक केले. मोहम्मद शमीला पुन्हा गोलंदाजीला बोलावण्याचा निर्णय योग्य ठरला अन् त्याने ३ षटकांत २ निर्धाव षटकं फेकून ८ धावा देताना ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था वाईट केली. 

रवींद्र जडेजाचा अफलातून झेल अन् MS Dhoni चं दहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल, Video

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांची अडचण केली होती. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला बोलावण्यात आले आणि त्याच्या गोलंदाजीवर स्मिथला LBW दिले गेले. पण, त्याने DRS घेतला अन् जीवदान मिळालं. मात्र पुढच्याच म्हणजे १२व्या षटकात हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. यष्टिरक्षक लोकेश राहुलने सुरेख झेल टिपला. स्मिथ २२ धावांवर माघारी परतला अन् मार्शसोबत त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. ( पाहा स्मिथच्या विकेटचा व्हिडीओ)

मार्शने अर्धशतक पूर्ण करताना काही अप्रतिम षटकार खेचून संघाची धावसंख्या शतकपार नेली. मार्शचे फटके पाहून चाहते चिंतेत गेले होते आणि ही चिंता रवींद्र जडेजाने दूर केली. मार्श ६५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर सिराजकरवी झेलबाद झाला. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. मार्नस लाबुशेन ( १५) याचा  रवींद्र जडेजाने अफलातून झेल टिपला. कॅमेरून ग्रीन आणि जोश इंग्लिस यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हाच हार्दिकने गोलंदाजीत बदल केला. मोहम्मद शमीने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना इंग्लिसचा ( २६) त्रिफळा उडवला.  १६९ धावांवर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी परतला. 

शमीने पुढच्याच षटकात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का देताना कॅमेरून ग्रीनचा ( १२) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनिसची विकेट मिळाली असती परंतु शुबमन गिलने स्लीपमध्ये झेल टाकला. पण, ही चूक त्याने पुढच्या षटकात भरून काढली. शमीच्याच गोलंदाजीवर स्टॉयनिसचा ( ५) सोपा झेल गीलने टिपला. कुलदीप महागडा ठरतोय असे दिसत असताना हार्दिकने पुन्हा रवींद्र जडेजाला गोलंदाजीलाव आणले आणि त्याने ग्लेन मॅक्सवेलची ( ८) विकेट मिळवू दिली. ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज १८४ धावांवर माघारी परतले.  


 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : Mohammed Shami knocks Cameron Green's off-stump with an absolute peach of a delivery, Shami in this spell: 3-2-8-3, he take 3 wickets in 11 balls, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.